प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास गरजेचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Mar-2021   
Total Views |
कारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
 

1_1  H x W: 0 x 
भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंऐवजी देशी वस्तूंचा वापर केल्याने त्यावर होणारा खर्च कमी करण्यात मदत होते. पुढील घटना आमच्या कंपनीतील सी.एन.सी. लेथशी संबंधित असून त्यावर गाडीचे अॅक्सल बनविले जात होते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या परदेशी ड्रिलिंग टूलच्या किंमती खूप जास्त होत्या. त्यामुळे हे टूल जर्मनीहून मागविण्याऐवजी भारतातील एका नामांकित टूल उत्पादक कंपनीकडून मागविण्याचे ठरले, ज्यामुळे टूलिंगचा बराच खर्च वाचणार होता. त्यानुसार 3 ड्रिलची खरेदी करून त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, पहिल्या कार्यवस्तूवरील चाचणीदरम्यानच दोन ड्रिल तुटल्या. कार्यवस्तूला स्पर्श केल्याबरोबर ड्रिल तुटले होते. यामुळे टूल विभागात काम करणारा कर्मचारी वैतागून म्हणाला की, ''या जर्मन मशीनवर केवळ जर्मन टूलच योग्य काम करू शकतील''.
 
यानंतर मशीनवरील चाचण्या थांबविण्यात आल्या आणि त्यावर मूळ जर्मन ड्रिल लावण्यात आले आणि ते ड्रिल व्यवस्थित चालले. दरम्यान, उद्भवलेल्या समस्येमध्ये मशीनिंग प्रोग्रॅम आणि संबंधित पॅरामीटरबद्दल कोणतीही शंका नव्हती, तर केवळ टूलसंबंधीची समस्या होती. त्यामुळे आम्ही वापरकर्त्यास विश्वासात घेऊन जर्मन टूल वापरून तयार झालेल्या भागावर भारतीय टूलचा वापर करून प्रोग्रॅम चालविला. यादरम्यान कार्यवस्तू आधीपासूनच तयार असल्यामुळे टूल तुटण्याचा प्रश्नच नव्हता. ड्रिलिंग प्रक्रियेदरम्यान भरपूर शीतकाचा वापर होत असल्याने यंत्रण प्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले हे दिसू शकले नाही.
तिसऱ्या चाचणीदरम्यान शीतकाचा प्रवाह थांबविण्यात आला आणि यंत्रण आवर्तनाचे निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी कार्यवस्तूची फिरण्याची दिशा टूल रचनेप्रमाणे नसल्याचे लक्षात आले. मशीनवर लावण्यात आलेले भारतीय टूल उजव्या हाताच्या शैलीचे होते, तर मूळ टूल डाव्या हाताच्या शैलीचे होते. जेव्हा कार्यवस्तूच्या फिरण्याची दिशा उजव्या हाताच्या पध्दतीच्या टूलला पूरक अशी केली गेली, तेव्हा भारतीय बनावटीच्या ड्रिलने व्यवस्थित कार्य केले. जर संबंधित विभागाने मूळ टूलचा बारकाईने अभ्यास केला असता, तर झालेले नुकसान नक्कीच टाळता आले असते. डाव्या हाताच्या प्रकारचे टूल आणि उजव्या हाताच्या प्रकारचे टूल नुसत्या डोळ्यांनी बघूनसुद्धा सहज ओळखता येतात. येथे सरळ फ्ल्यूट असलेली ड्रिल वापरली जात होती. एकूणच घडलेल्या या चुकीमधून बरेच काही शिकता आले. सर्पिलाकार आकाराच्या फ्ल्यूट असलेले डाव्या हाताचे आणि उजव्या हाताचे ड्रिल चित्र क्र. 1 मध्ये दाखविले आहेत.
तात्पर्य
फ्रंट लोडिंग सी.एन.सी. लेथमध्ये टूल मागच्या बाजूस असतात आणि म्हणून डाव्या हाताच्या यंत्रण शैलीची असतात त्यामुळे त्यांचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. उजव्या हाताची पध्दत म्हणजे उजव्या हाताच्या स्क्रूप्रमाणे टूल फिरते. टूल स्थिर असेल तर फिरणारी कार्यवस्तू घड्याळाच्या विरुध्द दिशेने फिरते.
@@AUTHORINFO_V1@@