रीग्राइंडिंग रीकंडिशनिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Mar-2021   
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
सध्याच्या स्पर्धात्मक जगात काय किंवा खरे तर आधीपासूनच प्रत्येक उद्योजकाला आपल्या उत्पाद किंवा सेवा देण्यासाठी होणारा खर्च कमी करण्याची गरज वाटत राहिली आहे. त्यासाठी उत्पादनात वापरल्या गेलेल्या प्रत्येक घटकाचा वापर योग्य प्रकारे कसा होईल हे बघितले जाते.

यंत्रण प्रक्रियेमध्ये यंत्रणासाठी वापरले जाणारे हत्यार हा उत्पादाच्या दर्जा आणि किंमतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा योग्य वापर कसा होईल, हे सतत बघितले जाते. वापरून खराब होणारे अथवा झिजणारे हत्यार फेकून न देता त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्याला रीग्राइंडिंग/ रीकंडिशनिंग करतात. या दोन्ही प्रक्रियांमध्ये हत्यार पुन्हा मूळ स्वरुपात आणण्यासाठी रीग्राइंडिंग केले जाते. जेव्हा रीग्राइंडिंग केलेल्या भागावर कोटिंग केले जाते, तेव्हा ते हत्यार रीकंडिशनिंग केले, असे म्हटले जाते.

सर्वसाधारणपणे छिद्र (होल) पाडण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे सॉलिड (घन) कार्बाईड वापरून बनवलेली असतात. हत्यारे बनविण्यासाठी सगळ्यात जास्त वापरले जाणारे दोन धातू म्हणजे एच.एस. एस. आणि टंग्स्टन कार्बाईड. एच.एस. एस. हत्यार वापरून खराब झाल्यानंतर पुन्हा ग्राइंडिंग करून वापरण्याची पध्दत पारंपरिक आहे. सी.एन.सी. मशिन्समध्ये या एच.एस.एस. हत्यारापेक्षा कार्बाईड हत्यारांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. अर्थात अपवाद म्हणून ती पारंपरिक (कन्व्हेंशनल) मशिनमध्ये वापरली जातात.

बरेचसे प्रमुख आणि मोठे हत्यार उत्पादक, टंग्स्टन कार्बाईडची हत्यारे बनविण्यासाठी आणि रीग्राइंडिंग करण्यासाठी सी.एन.सी. टूल अँड कटर ग्राइंडरचा वापर करतात.

रीग्राइंडिंग करताना नेहमी हत्याराच्या टोकाच्या झिजलेल्या भागाचे ग्राइंडिंग केले जाते. जर ते छिद्र करण्याचे हत्यार असेल आणि झिजलेले असेल तर ते किती खोलवर छिद्र करण्यासाठी वापरले जाते त्यानुसार त्याच्या खालच्या भागाची झीज होते. त्याच्या वापरल्या गेलेल्या भागाचे ’रफिंग’ करावे लागते किंवा झिजलेला भाग कापून टाकून पुन्हा नव्याने त्याच्या टोकाला रीग्राइंडिंग करून पाहिजे तो भौमितिक आकार (एंड पॉइंट जॉमेट्री) द्यावा लागतो. ही पध्दत सर्वड्रिल्सबाबत वापरली जाते. विशेष करून होल मिल्सबाबत जर पूर्ण लांबी वापरली जातअसेल, तर रीग्राइंडिंग करताना ड्रिलचा व्यासत्याच्या पूर्ण लांबीवर कमी केला जातो किंवा लांबी कमी केली जाते. संपूर्णपणे रीग्राइंडिंगकरून नवीन ड्रिल तयार केले जाते.

रीग्राइंडिंग झाल्यावर कोटिंग करण्याचे काम असते. ते करण्यात प्राविण्य मिळवलेले बरेच व्यावसायिक आहेत, त्यामुळे हत्याराला रीग्राइंडिंग करून झाले आणि कर्तन कड (Cutting edge) तयार झाली की, अशा तरबेज कोटिंग करणाऱ्याकडे ते कोटिंगसाठी दिले जाते. किती कोटिंग करायचे आणि कशा पध्दतीने कोटिंग करायचे याचा निर्णय कोटिंग करणारा उत्पादक हा ग्राहकाच्या गरजेनुसार किंवा ग्राहकाबरोबर त्याचा जो करार असेल त्याप्रमाणे घेतो.

टंग्स्टन कार्बाईड हत्यारे वापरताना सी.एन.सी. मशिन्स एका विशिष्ट वेगाने वापरणे जरुरीचे असते, कारण त्यामध्ये आवर्तन काळ (सायकल टाईम) वाढण्याची शक्यता असते. हत्याराची भूमिती वापरून खराब झाली असेल, तर आवर्तन काळ वाढतो, म्हणून सी.एन.सी. मशिनवर वापरली जाणारी हत्यारे अचूक रीग्राइंडिंग करून त्यांच्या मूळ आकाराची (जॉमेट्री) केली असतील, तर योग्य ते पॅरामीटर वापरून पाहिजे त्या वेगाने उत्पादन करता येते.

2_1  H x W: 0 x
 
 

23_1  H x W: 0  


रीग्राइंडिंगसाठी वापरत असलेली यंत्रे
यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन्समध्ये (टूल आणि कटरसारख्या) कोणतेही ग्राइंडिंग करता येते, मात्र हत्याराचे रीग्राइंडिंग करण्यासाठी ऑपरेटरचे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आणि निर्णायक (critical) ठरते. काही आयात केलेल्या मशिन्समध्ये ती पारंपरिक असूनदेखील त्यांच्याबरोबर येणाऱ्या ॲटॅचमेंटमुळे ऑपरेटरच्या कौशल्याला तितकेसे महत्त्व राहत नाही. त्यांचा वापर एच.एस.एस. हत्यारामधील त्याच्या टोकाची भूमिती तयार करण्यासाठी केला जातो. हत्याराच्या फ्लुटच्या मुळापर्यंत रीग्राइंडिंग करता येते.


4_1  H x W: 0 x

आता टंग्स्टन कार्बाईडकरिता वापरल्या जाणाऱ्या मशिन्सबद्दल माहिती घेऊ. रीग्राइंडिंग यंत्रांच्या एकूण बाजारपेठेपैकी सुमारे 20% वाटा हा भारतीय उत्पादकांच्या यंत्रांचा आहे. त्याचबरोबर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतात बनविलेली यंत्रे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचे बाजारपेठेतील प्रमाण सुमारे 60% ते 70%पर्यंत असावे. बाजारपेठेत नजर टाकली, तर प्रामुख्याने तुम्हाला भारतीय बनावटीचे एक आणि एखादा परकीय उत्पादक यांची मशिन्स दिसतात. काही क्लिष्ट (अवघड) कामे म्हणजे भौमितिक आकार करणे किंवा तशा पद्धतीची इतर कामे करण्यासाठी ही मशिन्स वापरता येतात. परदेशी कंपन्यांमध्ये ANCA कंपनीची यंत्रे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर इंटरफेस आणि 100% स्वयंचलित प्रणालीमुळे अधिक लोकप्रिय आहेत.

आमच्याकडे टीजीटी आणि ANCA ही मशिन्स आहेत. टीजीटी या भारतात बनवलेल्या मशिनवर आम्ही सुरुवातीची (रफिंग) कामे करतो आणि ANCA मशिनवर सर्व भौमितिक आकाराची कामे जलदगतीने करता येत असल्यामुळे रीग्राइंडिंगची कामे करतो.


5_1  H x W: 0 x

रीग्राइंडिंग बाजारपेठेवर दृष्टीक्षेप
सध्या प्रत्येक बाबतीत पै-पैचा हिशोब केला जात असल्यामुळे रीग्राइंडिंगमुळे होणारी बचत महत्त्वाची ठरते. म्हणूनच दिवसेंदिवस रीग्राइंडिंगचे महत्त्व वाढायला लागले आहे. सध्या बरेच उत्पादक रीग्राइंडिंग करणार्यांशी, उत्पादनाशी निगडित करार करतात. म्हणजे रीग्राइंडिंग करणारा उत्पादक, त्याने काम केलेले हत्यार वापरून किती भाग बनविता येतील/ छिद्र करतायेतील, याची हमी देतो आणि ग्राहकाकडे तयार होणाऱ्या दर भागामागे किती पैसे मिळणार ते ठरवून घेतले जाते. काही उत्पादक असेही प्रस्ताव मांडतात की, तुम्ही आमच्याकडून हत्यार खरेदी केलेत तर मी ते दोनदा किंवा तीनदा रीग्राइंड करून देईल. कोण ग्राहक आहे किंवा तो किती किंमत मोजत आहे, त्यानुसार हे व्यवसायाचे धोरण ठरवून निर्णय घेतले जातात.

सध्या रीग्राइंडिंगच्या बाजारपेठेला फार महत्त्व आले आहे. त्यात प्रामुख्याने स्थानिक उत्पादकच आहेत. फारसे आंतरराष्ट्रीय उत्पादक नाहीत. एकट्या महाराष्ट्रातील हत्यारांची बाजारपेठ जवळजवळ 120 ते 150 कोटी रुपयांची आहे, त्यापैकी रीग्राइंडिंगचा हिस्सा 20-30 % आहे. प्रत्येक हत्यार कमीतकमी पाच ते सहा वेळा रीग्राइंडिंग करून वापरले जाते.

यामध्ये इन्सर्ट ग्राइंडिंग समाविष्ट नाही, कारण थोडेच लोक ते काम करतात. ही बाजारपेठ फारशी मोठी होऊ शकली नाही. कारण रीग्राइंडिंग केलेले इन्सर्ट फक्त पारंपरिक मशिनवर वापरता येतात. सी.एन.सी. मशिन्स बाजारात आल्यावर उत्पादकतेवर जास्त भर दिला जात असल्यामुळे हळूहळू इन्सर्ट रीग्राइंडिंग बंद होत चालले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या रीग्राइंडिंगच्या व्यवसायात आहेत, मात्र ते केवळ त्यांच्या उत्पादनांसाठी हा व्यवसाय करतात. इतरांच्या उत्पादनांसाठी ते रीग्राइंडिंग करत नाहीत. ’केनामेटल’ कंपनीचा रीग्राइंडिंग हा वेगळा विभाग आहे. ’सँडविक’ कंपनीसुद्धा त्यांच्या उत्पादनांसाठी ही सेवा देते. हल्ली बरेच नवीन लोक या व्यवसायात प्रवेश करत आहेत, जे कुठल्याही उत्पादकाने बनविलेल्या हत्यारांचे रीग्राइंडिंग करून देतात. ’ओएसजी’ ही या क्षेत्रातील मोठी कंपनी असून भोसरीमध्ये त्यांचे रीग्राइंडिंग केंद्र आहे.

टूलिंग क्षेत्रात रीग्राइंडिंग हा दुय्यम दर्जाचा व्यवसाय राहिलेला नाही. तो स्वत:साठी केला जाणारा व्यवसाय आहे. हळूहळू ही परिस्थिती बदलू लागली आहे, मात्र प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपनीची स्वत:ची पेटंट केलेली ’जॉमेट्री लाईन प्रोसेस’ असते जी त्यांना इतरांबरोबर शेअर करणे शक्य नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्वतंत्र उद्योगावर मर्यादा येतात.

कोणतेही आयात केलेले मशिन जेव्हा विकले जाते तेव्हा उत्पादक तुम्हाला त्या मशिनमधील हत्याराची भौमितिक रचना देतात, जी त्या उत्पादकाशीच संबंधित असते. कधी कधी काही भौमितिक रचना गुप् ठेवल्या जातात आणि मशिनबरोबर दिल्या जात नाहीत. जेव्हा आम्ही कोणाच्याही डिझाईनप्रमाणे (गरजेप्रमाणे) हत्यार बनवतो तेव्हा त्याला ’कस्टम टूल’ म्हणतो. बहुतेक वेळा टोकाची भौमितिक रचना (एंड जॉमेट्री) बदलत नाही. त्यामुळे कापण्याचे काम करणारी भौमितिक रचना आहे तशीच राहते आणि त्या व्यासाच्या कोणत्याही हत्यारावर ती तशीच आढळून येते.


5_1  H x W: 0 x

नवीन घडामोडी
पूर्वी एच.एस.एस. पाहिजे असेल तेव्हा जनरल पर्पज एच.एस.एस. वापरले जायचे. आता यात बदल होत आहेत. आता खास एच.एस.एस. म्हणजे उच्च श्रेणीचे एच.एस. एस. वापरतात. झीज होण्यास त्याचा विरोध (वेअर रेझिस्टन्स) जास्त असतो. कन्व्हेंशनल मशिन्सकरता पूर्वीप्रमाणेच एच.एस.एस. वापरतात. सी.एन.सी. मशिन्समध्ये कार्बाईड वापरतात, कारण त्यामुळे जास्त उत्पादकता मिळते.

कोणताही विक्रेता हत्यार विकण्यासाठी येतो तेव्हा रीग्राइंडिंग केल्यावर मिळणारी उत्पादकता ही मूळ हत्याराइतकी असायला पाहिजे अशी मागणी केली जाते. पूर्वी ग्राहक, हत्यार थोडेसे चांगले असले तरी आवश्यक तेवढे उत्पादन होत नसल्यास ते टाकून द्यायचे. त्या हत्याराशी निगडित उत्पादनाचा तपशील ठेवला जात नसल्यामुळे हत्याराचे आयुष्य (टूल लाईफ) वाया गेलेले लक्षात यायचे नाही. मात्र आता प्रक्रिया सुधारत आहे. उत्पादनाची आकडेवारी विविध पध्दतीने नोंद करून ठेवली जात असल्यामुळे ग्राहक एका हत्याराचा वापर करून किती भागांचे (पार्ट) उत्पादन झाले पाहिजे अशी मागणी करू शकतो आणि तेवढया भागांचे उत्पादन झाले नाही तर हत्याराचा पुरवठा करणाऱ्याला जाब विचारू शकतो. रीग्राइंडिंगच्या व्यवसायात सध्या यंत्रण करणाऱ्या कंपन्या पुरवठादाराबरोबर हत्याराचे आयुष्यमान किंवा उत्पादन होणाऱ्या भागांची संख्या यांच्याविषयी करार करूनस्वतःची बाजू सुरक्षित करून घेतात. या कंपन्यामध्ये उत्पादन होणाऱ्या भागांची संख्या सतत वाढत असल्यामुळे एकदा प्रक्रिया सेट झाली की, मशिन न बदलता त्या भागाचे उत्पादन कायम चालू ठेवतात. भागामध्ये काहीही बदल होत नाही, त्यामुळे जे हत्यार - पुरवठादार हमी देतील किंवा रीग्राइंडिंगच्या खर्चाचा करार करायला तयार असतील त्यांनाच प्राधान्य मिळते. हल्ली ही नवीन पध्दत सुरू झाली आहे.


box_1  H x W: 0

पूर्वी सी.एन.सी. उत्पादनात जुना झिजलेला भाग काढून रीग्राइंडिंग करताना त्याची भौमितिक रचना (एंड जॉमेट्री) नवीन करण्याची पध्दत होती. सी.एन. सी. उत्पादनात सध्या एज कंडिशनिंगवर भर दिला जातो. रीग्राइंडिंग केल्यानंतर कोटिंग करण्यापूर्वी एज प्रिपरेशन करण्यात येते. कोटिंग करणारे उत्पादक, कडेवर विशिष्ट प्रक्रिया करून आपल्या ग्राहकाला त्या हत्याराचे जास्तीत जास्त आयुष्यमान मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
@@AUTHORINFO_V1@@