मशीनिंग क्लाउड अ‍ॅप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Mar-2021   
Total Views |
 कारखान्यातील सतत बदलत्या कामाच्या स्वरुपांनुसार अथवा प्रचलित कामात सुधारणा करण्याकरिता टूलिंगचे इष्टतम पर्याय शोधणे, हे बऱ्याचवेळा कष्टदायक आणि वेळ खाणारे काम असते. उपलब्ध सर्व प्रकारच्या टूलिंगविषयी आणि त्याला पूरक इतर यंत्रणविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या मशीनिंग क्लाउड अॅपविषयी या लेखात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
 
 
कटिंग टूल उत्पादक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी, मशीनिंग क्लाउड अॅप हे एक इंडस्ट्री 4.0 सोल्युशन आहे. कटिंग टूल निर्मात्यांच्या उत्पादांचे अद्ययावत ज्ञान आणि माहिती (डाटा), कटिंग टूलच्या निवडीचे फास्ट ट्रॅकिंग, सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग, सिम्युलेशन आणि मशीन शॉपमधील कामे या सर्व गोष्टी हे अॅप हाताळते. मशीनिंग क्लाउड ही सी.एन.सी. कटिंग टूल आणि कार्यवस्तू पकडण्याची (वर्क होल्डिंग) साधने यांची माहिती पुरविणारी स्वतंत्र व्यवस्था आहे. आपल्या डेस्कटॉपवर विविध प्रकारच्या पुरवठादारांकडून त्यांच्या सर्व उत्पादांविषयी सर्वात ताजी माहिती डिजिटल स्वरूपात मिळविता येऊ शकते आणि तीही एकाच स्रोतातून, हे फक्त कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात शक्य आहे. संपूर्ण आणि तपशीलवार उत्पाद माहिती देण्यापलीकडे मशीनिंग क्लाउड आपल्याला एक एकात्मिक (इंटिग्रेटेड) टूलसेट उपलब्ध करून देते, जेणेकरून आपण अशक्य वाटेल अशा वेगाने आणि सहजतेने ती माहिती कामाच्या जागी उपयोगात आणू शकता. कटिंग टूलच्या अग्रगण्य उत्पादकांकडून उत्पादांची संपूर्ण आणि नेहमीच अद्ययावत असलेल्या माहितीपर्यंत पोहोचण्याचा एकल (सिंगल) स्रोत मशीनिंग क्लाउड उपलब्ध करते. कटिंग टूल निर्मात्यांना त्यांच्या अंतिम वापरकर्त्यांबरोबर जोडून मशीनिंग क्लाउड, सर्वोत्कृष्ट टूलिंग उत्पादने शोधणे, निवडणे आणि त्यांचा सर्वोत्कृष्ट वापर कसा करायचा ते निश्चित करण्याशी संबंधित वैताग आणि वेळेचा अपव्यय लक्षणीयरित्या कमी करते. टूलचा वापर आणि भूमिती यांच्याविषयीची कटिंग टूल उत्पादकांकडून मिळणारी वर्णनात्मक माहिती आणि अॅप्लिकेशनचे ज्ञान मशीनिंग क्लाउडद्वारे सहज उपलब्ध होते. याचा फायदा घेऊन कॅम प्रणाली, सिम्युलेशन आणि टूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, कटिंग टूल प्रीसेटर, मशीन टूल आणि मशीन शॉपमधील इतर उपकरणांचा वापर करण्यास चालना मिळते.

1_1  H x W: 0 x
 
 
उत्पादन उद्योगातील विशिष्ट क्षेत्रात कामातील कार्यक्षमतेची नवीन पातळी गाठण्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल बदल घडवून आणण्यामध्ये मशीनिंग क्लाउड महत्त्वाची भूमिका बजावते. कटिंग टूल, मशीन टूल, कार्यवस्तू पकडण्याची साधने आणि स्पेशॅलिटी प्रॉडक्टच्या जगातील आघाडीच्या निर्मात्यांकडील क्लाउड आधारित अॅप्लिकेशन, संसाधने, सेवा, ज्ञान आणि डिजिटल उत्पाद माहिती उपलब्ध झाल्यामुळे, आजच्या माहितीच्या जोरावर चालणाऱ्या मशीन शॉपमध्ये माहितीचा प्रवाह सुलभ होत आहे आणि त्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होत आहेत.
इष्टतम (ऑप्टिमाइज्ड्) टूलिंग शोधताना मशीनिंग क्लाउडद्वारा जगातील अग्रगण्य पुरवठादारांकडील माहिती उपलब्ध होत असल्याने छापील कॅटलॉग, टेलिफोनवरील संभाषण आणि अनेक वेबसाइटवर शोध घेण्याचा त्रास दूर होतो. तसेच कॅड/कॅम सॉफ्टवेअरमध्ये टूलिंग डेटा हाताने टाइप करण्याचे कष्ट करावे लागत नाहीत.

हे वापरकर्त्यास कशी मदत करते?
• माहिती संकलनाचे इष्टतमीकरण (ऑप्टिमायझेशन)
• क्लाउड आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग
• अॅप्लिकेशनसाठी योग्य अशा टूलची निवड
• एकाधिक कॅटलॉगवर संशोधन करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत कपात
• टूल निवडीसाठी आवश्यक वेळ 75% कमी
• यंत्रण करणाऱ्याला कॅम, सिम्युलेशन, टूल मॅनेजमेंट यांची पर्याप्त माहिती, तसेच मशीन शॉपमधील सॉफ्टवेअरमध्ये भूमितीय माहितीचे थेट डाउनलोड
 
चुटकीसरशी अॅसेम्ब्ली तयार करा
3D मॉडेल निर्मिती : उत्पादकांनी पुरविलेली उत्पाद माहिती वापरून काही मिनिटांत टूलिंग अॅसेम्ब्ली तयार करता येते. 3D मॉडेल आणि 2D ड्रॉईंग डाउनलोड करता येतात. त्यामुळे प्रोग्रॅमिंगची अचूकता सुधारते आणि आपल्या मशीनवर काम चालू असताना संबंधित उपकरणे एकमेकांवर आदळण्याची शक्यता कमी होते.
माहिती पाठविणे : आपली कॅम सिस्टिम, टूल व्यवस्थापन आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर यांच्यामध्ये अखंडपणे टूलिंग माहितीची देवाणघेवाण करता येते. या सुविधेमुळे आणि त्यातील अचूकतेमुळे आपल्या कार्यप्रवाह (वर्क फ्लो) प्रक्रियेमधील काही तास किंवा दिवससुद्धा वाचतील.
सहयोग : आपल्या सहकाऱ्यांबरोबर कामे, टूल आणि मशीनची माहिती शेअर करता येत असल्यामुळे कार्यगटातील प्रत्येक सदस्यास आपल्या कामासाठी नवीनतम टूलिंग खात्रीलायकपणे पोहोचता येते.
 
प्रॉडक्टिव्हिटी टूलकिट कार्यप्रवाहाची गती वाढविते.
• कामाचे व्यवस्थापन (जॉब मॅनेजमेंट) : थेट मशीनिंग क्लाउडवरून कोणते काम कसे करायचे ते ठरवा, जतन करा आणि सर्वांना उपलब्ध करा, अगदी सुरक्षितपणे.
  1.  टूलच्या याद्या स्टँडर्ड स्वरूपातील अहवाल म्हणून डाउनलोड केल्या जाऊ शकतात. इच्छेनुसार ERP, MES किंवा अन्य सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमध्ये आयात करता येतात.
  2.  किंमत आणि उपलब्धता, कोटेशन आणि खरेदी ही कामे आर्ट-टू-पार्ट टाइमलाइनला गती देतात.
  3.  संपूर्ण आंतरराष्ट्रीय मशीनिंग समुदायासाठी खुले, तटस्थ, सार्वत्रिक व्यासपीठ
• कामाचा व्यवस्थापक (जॉब मॅनेजर) : आपली टूलिंग पॅकेज भविष्यातील संदर्भ आणि वापरासाठी मशीनिंग क्लाउडवर सुरक्षितपणे जतन केलेली असतात. आपल्या संपूर्ण कार्यगटासोबत ती शेअर करा आणि सहयोगाने काम करा. आपल्या डेस्कटॉप किंवा टॅब्लेटवरून कुठेही/केव्हाही अॅक्सेस.
• फायदे : आपल्या टूलिंग पॅकेजचे व्यवस्थापन आणि शेअरिंग सुलभपणे होते. खरेदी, प्रोग्रॅमिंग, इन्व्हेंटरी, प्री-सेटिंग आणि यंत्रणासाठी सुलभ अॅक्सेस.
• अहवाल : कामाचा अहवाल पीडीएफ आणि एक्सेलवर मिळतो, बिल ऑफ मटेरियलमध्ये 3D टूल ड्रॉइंग, स्पेअर पार्ट, कॉलआउट, वर्णनात्मक आणि वापरविषयक माहिती समाविष्ट आहे.
• फायदे : आपल्या टूलिंग पॅकेजचे स्पष्ट दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन)
 
उत्पाद माहिती थेट आपल्या कामाच्या जागेवर डाउनलोड करा.
• कर्तनवेग आणि सरकवेग : निर्मात्याने शिफारस केलेले कर्तनवेग आणि सरकवेग सहज उपलब्ध होत असल्यामुळे कर्तनवेग आणि सरकवेग शोधून काढण्याची नेहमीची प्रथा आता आवश्यक नसते.
• ISO प्लस : मानके, ISO 13399, STEP, GTC, DIN 4000 आणि MTC कनेक्ट यांचा वापर.
• फायदे : निर्मात्याच्या उत्पादांची वर्णनात्मक, वापर आणि भूमितीय माहिती डिजिटल स्वरूपात सहज उपलब्ध होते.
 
वेळ वाचविण्यासाठी आणि अचूकता वाढविण्यासाठी सोपा उपाय - अगदी चुटकीसरशी उपलब्ध!
• आपली टूल निवडा.
• आपल्या अॅसेम्ब्ली तयार करा.
• स्टॉकची उपलब्धता पडताळून पहा.
• कर्तनवेग आणि सरकवेगाच्या सूचना मिळवा.
• माहिती डाउनलोड करा.
• आपल्या कार्यगटाबरोबर शेअर करा.
फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड आणि मशीनिंग क्लाउड यांनी फोर्ब्स उत्पादांची माहिती क्लाउडवर उपलब्ध करण्यासाठी भागीदारी केली आहे. औद्योगिक अॅप्लिकेशनमधील थ्रेडिंग, मिलिंग, ड्रिलिंग आणि डीबरिंग या कामांसाठी, टोटेम या ब्रँड नावाने फोर्ब्स अतिशय काटेकोर (प्रिसिजन) अभियांत्रिकी टूलची निर्मिती करतात.
मशीनिंग क्लाउड हा कटिंग टूल, सी.एन.सी. मशीन आणि कार्यवस्तू पकडण्याची साधने यांच्यासाठी एक उत्पाद डेटा इंटरफेस आहे. सुरुवातीला हे एक अॅप्लिकेशन म्हणून उपलब्ध होते, परंतु ज्या संस्थांच्या IT धोरणांतर्गत त्रयस्थ कंपनीची (थर्ड पार्टी) सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास परवानगी नव्हती, त्यांना हे वापरण्यात अडचणी होत्या. तथापि अलीकडेच सुरू केलेल्या वेब आवृत्तीमध्ये या समस्यांचे निराकरण केलेले आहे.
फोर्ब्स आणि मशीनिंग क्लाउड यांच्यातील भागीदारी क्लाउड-आधारित तंत्रज्ञानाच्या सुविधेचा उपयोग करेल. यामुळे त्यांच्याकडील कटिंग परिस्थितीला योग्य अशा कटिंग टूलचा शोध घेण्यासाठी एकाधिक कॅटलॉग किंवा वेबसाइटवर संशोधन करण्याची ग्राहकांची आवश्यकता आता कमी होईल आणि त्यांच्या उत्पादन कार्यासाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याचे त्यांचे काम सुलभ होईल.
 
मशीनिंग क्लाउडच्या वापरकर्त्यांचा प्रतिसाद
आमचे जगभरातील ग्राहक मशीनिंग क्लाउडचा वापर करतात. याचा वापर करून ग्राहकांना मिळालेले काही फायदे येथे नमूद केले आहेत.
• आमचे एक वापरकर्ते टूल भूमिती, ESPRIT मध्ये निर्यात करण्याचे एक फीचर नियमितपणे वापरतात. टूलची परिमाणे (डायमेन्शन) तपासण्यासाठीदेखील याचा वापर करून, ते त्यांची लायब्ररी अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करतात. अन्यथा, टूल भूमितीची निर्मिती करणे त्यांच्यासाठी अवघड आहे, अगदी सहज गोंधळ होऊ शकतो.
• दुसरे एक ग्राहक म्हणतात, 'समजा मी एखादा यंत्रभाग बनवित असलो आणि माझ्याकडे एखादे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण टूल असेल, तर मी क्लाउडवर ते जतन (सेव्ह) करतो. सहा महिन्यानंतर जेव्हा मला एखादा इन्सर्ट स्क्रू किंवा दुसरे काही शोधण्याची आवश्यकता असेल, तेव्हा मी क्लाउडवरून सहजपणे त्याचा तपशील मिळवू शकतो आणि ते मागवू शकतो.
 
• आमच्या ग्राहकांपैकी एकाने कटिंग टूल निवड प्रक्रियेमध्ये खर्च होणारा कमीतकमी 60% वेळ वाचविला आहे. हे केवळ यातील सहजतेमुळेच नव्हे तर येथे कटिंगविषयक उत्तम माहिती उपलब्ध असल्यामुळे, विश्वासार्ह झालेल्या टूल अॅप्लिकेशनचादेखील हा परिणाम आहे. अॅसेम्ब्ली व्यवस्थित केली जाईल याची त्यांना पूर्ण खात्री असते. डिझाइन केलेले यंत्रभाग आणि निवडलेली टूल जतन करण्याची क्षमता, सामायिकीकरण (शेअरिंग) आणि सहकार्यासाठी खूप उपयुक्त आहे. ते म्हणतात, "मला असे वाटते की एकापेक्षा जास्त उत्पादकांसह काम करणाऱ्यांसाठी हे एक मौल्यवान साधन आहे. यामुळे माहिती गोळा करणे अतिशय सुलभ होते. सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध असते याचा आम्हाला फायदा होतो. कटिंगचे पॅरामीटर एके ठिकाणी पहा, तर यंत्रभाग क्रमांक दुसऱ्या ठिकाणी शोधा, असे करावे लागत नाही. आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळू शकतात."
• यामाझाकी मझाक यांच्याबरोबर आमची चांगली भागीदारी आहे. मझाकचे महाव्यवस्थापक म्हणतात, "मशीनिंग क्लाउडबरोबरच्या भागीदारीच्या माध्यमातून मझाक मशीनवर वापरल्या जाणाऱ्या हत्यारधारकांशी (टूल होल्डर) संबंधित सर्व तांत्रिक माहिती आमच्या ग्राहकांना मिळणे सोयीचे होईल आणि ते त्याचा आनंदाने लाभ घेतील."
• 'मशीनिंग क्लाउड हा एकच स्रोत वापरून VERICUT वापरकर्ते एकाधिक विक्रेत्यांकडून कटिंग टूलची अचूक 3D मॉडेल आणि उत्पादकांनी शिफारस केलेल्या सरकवेग/कर्तनवेगाची माहिती मिळवू शकतात. VERICUT च्या मशीनिंग क्लाउडशी असलेल्या संबंधांमुळे, 'स्मार्ट' टूल वापरून सिम्युलेशन विकसित केले गेले आहे. यात जेव्हा टूल चुकीच्या पद्धतीने किंवा त्यांच्या निर्धारित वापराच्या रेंजच्या बाहेर वापरली जातात, तेव्हा प्रोग्रॅमरना चेतावणी दिली जाते आणि सरकवेगाचा दर इष्टतम करण्यासाठी सेटअप आधीपासून कॉन्फिगर करता येतो.'
 
अधिक माहिती सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन घेऊ शकता.
 
@@AUTHORINFO_V1@@