चालित हत्यारधारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Apr-2021   
Total Views |

लेथवर चालित हत्यारधारक (ड्रिव्हन टूल होल्डर) Driven Tool Holder वापरून त्याद्वारे ड्रिलिंग, मिलिंग अशा प्रक्रिया केल्या जातात. सेटअपची संख्या कमी असल्यामुळे जास्त अचूकता मिळते. या लेखामध्ये वाचकांना चालित हत्यारधारकाचे महत्त्वाचे प्रकार, कार्यतत्त्व आणि त्यांच्या वापरण्याच्या पद्धती याबाबत तपशीलवार माहिती वाचावयास मिळेल.
पूर्वी सी.एन.सी. लेथवर केवळ टर्निंग प्रक्रियाच केली जायची आणि मशीनिंग सेंटर ड्रिलिंग आणि मिलिंगसाठी वापरले जायचे. पुढे त्यामध्ये सुधारणा होत होत टर्नमिल सेंटर ही त्याच्या पुढची आवृत्ती आली. यामध्ये चालित हत्यारधारक (ड्रिव्हन टूल होल्डर) वापरून ड्रिलिंग, मिलिंग अशा प्रक्रिया केल्या जातात. रफिंगपासून फिनिशिंगपर्यंतची सर्व कामे एकाच सेटअपमध्ये होत असल्यामुळे येथे जास्त अचूकता मिळते.

1_1  H x W: 0 x
त्यानंतर ट्विन स्पिंडल किंवा सबस्पिंडल, टर्नमिल स्पिंडलसह सबस्पिंडल (चित्र क्र. 1) अशा सुधारित आवृत्त्या मशीनमध्ये आल्या. आतापर्यंतच्या मशीनमध्ये X आणि Z असे दोनच अक्ष होते. परंतु नवीन आवृत्तीमध्ये Y अक्षाचा समावेश झाला. ज्या मशीनमध्ये टरेट वर-खाली या दिशेमध्ये हलू शकतो त्याला Y अक्षासह टर्नमिल सेंटर (चित्र क्र. 2) असे म्हटले जाते.
2_1  H x W: 0 x
चालित हत्यारधारकाचे कार्यतत्त्व
सी.एन.सी. टर्निंग सेंटरवरती चालित (ड्रिव्हन) टूलमुळे टर्निंगसह मिलिंग, ड्रिलिंग आणि टॅपिंगची कामे करणे शक्य आहे. टूल ड्राइव्हसाठी विविध मानके आहेत. त्याच्यात DIN 1809 असे मानक आहे. चालित टूलमध्ये टरेटमधून टूलसाठी ड्राइव्ह येतो. त्याच्या टोकाला टेननसारखा भाग असतो. टेनन ड्राइव्हच्या खाचेमध्ये (स्लॉट) जातो. तिथे टरेटमधून ड्राइव्ह (चित्र क्र. 3) दिला जातो. हे हत्यारधारक टरेटसोबतच वापरता येतात. त्यामध्ये त्याला ड्राइव्ह द्यावा लागतो. टूल यंत्रण स्थितीत असतानाच टूल ड्राइव्ह त्याला जोडला जातो. टरेटमध्ये चालित हत्यारधारकासाठी स्वतंत्र ड्राइव्ह असतो. टरेट इंडेक्सिंगसाठी लेथवरील सिस्टिमप्रमाणे त्याला मोटर दिलेली असते. उदाहरणार्थ, लेथवर फानुकची सिस्टिम असेल, तर त्याला फानुकची मोटर दिलेली असते. ही मोटर लाइव्ह टरेटवर ठेवली जाते.
3_1  H x W: 0 x
चालित हत्यारधारकांचे प्रकार


4_1  H x W: 0 x
Verein Deutscher Ingenieure (VDI) ही जर्मनीतील अभियंत्यांची संघटना आहे. या संघटनेने यंत्रण अभियांत्रिकीसंदर्भात मानके तयार केली आहेत. त्यानुसार त्या उपसाधनांची रचना केली जाते. उदाहरणार्थ, सुरुवातीला VDI अॅक्शिअल टूल डिस्क वापरात होत्या. त्यानंतर रेडियल टूल डिस्क आवृत्ती आली. यंत्रभागाच्या दोन्ही बाजूचे यंत्रण करण्यासाठी रेडियल टूल डिस्क वापरले जाते. VDI मध्ये होल्डिंग शँकवर सेरेशन असते आणि त्यावर एक क्लॅम्प असतो. त्या क्लॅम्पला पाचर (वेज) पद्धत वापरून टूल होल्डर पकडला जातो. त्यानंतर बेस माउंटिंग टाइप (BMT) ही आवृत्ती आली. टूलिंगमधील प्रगत आवृत्ती म्हणून ती ओळखली जाते. VDI धारकामध्ये पाचर पद्धत वापरून क्लॅम्पिंग होते तर BMT मध्ये तीन किंवा चार लोकेशन की असतात आणि 4 बोल्ट वापरून क्लॅम्पिंग (चित्र क्र. 4) केलेले असते. BMT मध्ये फक्त रेडियल डिस्क असते. मुख्य स्पिंडलला आणि सबस्पिंडलला दोन्ही बाजूला ऑपरेशनसाठी टूल होल्डर बसविलेले असतात. त्यामध्ये रेडियल आणि अॅक्शिअल अशा दोन्ही प्रकारचे लाइव्ह हत्यारधारक किंवा डबल साइडेड हत्यारधारकदेखील असतात. डबल साइडेड हत्यारधारकावर दोन्ही बाजूला टूलिंग असते. समोरील (फ्रंट) टूल मुख्य स्पिंडलसाठी काम करते तर, मागील टूल सबस्पिंडलसाठी काम करते. BMT आवृत्ती VDI पेक्षा जास्त मजबूत असते. त्यांची पुनरावर्तनक्षमता चांगली असून ती 10 मायक्रॉनच्या वारंवारितेमध्ये असते. त्याच्या पुढची आवृत्ती आहे ती अँग्युलर हेड. अँग्युलर हेडमध्ये हत्यारधारक 0° ते 90 अंशाच्या कोनामध्ये (अँगल) सेट करता येतो. कमीतकमी 1° अशी त्याची मर्यादा आहे. दोन्ही बाजूला +90° ते -90° या रेंजमध्ये कोणत्याही कोनीय दिशेमध्ये टूल फिरविता येते.


t1_1  H x W: 0
चालित हत्यारधारक वापरण्याच्या काही पद्धती
1. OD माउंटिंग : अक्षीय मशीनिंगसाठी रेडियल चालित टूल (90° टूल)

5_1  H x W: 0 x
2. OD माउंटिंग : रेडियल मशीनिंगसाठी अक्षीय चालित टूल (0° टूल)

6_1  H x W: 0 x
3. फेस माउंटिंग : अक्षीय मशीनिंगसाठी अक्षीय चालित टूल (0° टूल)

7_1  H x W: 0 x
4. फेस माउंटिंग : रेडियल मशीनिंगसाठी रेडियल चालित टूल (90° टूल)

8_1  H x W: 0 x
अक्षीय मशीनिंगसाठी रेडियल चालित टूलचे OD माउंटिंग
A. मशीन स्पिंडलच्या संदर्भात उजवीकडे आणि वरती स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या बाह्य व्यासावर (OD) बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)
9_1  H x W: 0 x
B. मशीन स्पिंडलच्या संदर्भात डावीकडे आणि वरती स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या बाह्य व्यासावर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

10_1  H x W: 0
C. मशीन स्पिंडलच्या संदर्भात उजवीकडे आणि खाली स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या बाह्य व्यासावर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

11_1  H x W: 0
D. मशीन स्पिंडलच्या संदर्भात डावीकडे आणि खाली स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या बाह्य व्यासावर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

12_1  H x W: 0
रेडियल मशीनिंगसाठी रेडियल चालित टूलचे फेस माउंटिंग
A. मशीन स्पिंडलच्या संदर्भात उजवीकडे आणि वरती स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या समोरील बाजूवर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

13_1  H x W: 0
B. मशीन स्पिंडलच्या संदर्भात डावीकडे आणि वरती स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या समोरील बाजूवर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

14_1  H x W: 0
C. मशीन स्पिंडलच्या संदर्भात उजवीकडे आणि खाली स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या समोरील बाजूवर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

15_1  H x W: 0
D. मशीन स्पिंडलच्या संदर्भात डावीकडे आणि खाली स्थान असलेल्या टरेट डिस्कच्या समोरील बाजूवर बसणारे रेडियल चालित टूल (90° टूल)

16_1  H x W: 0
जेव्हा चालित हत्यारधारकाचे डिझाइन केले जाते तेव्हा तो कुठल्याही स्टँडर्ड मशीनवर वापरता येईल असा विचार केला जातो. BMT मध्ये माउंटिंगची जागा निश्चित केलेली असते. त्यामुळे कोणत्याही मशीनला तो वापरता येतो. विविध मशीनवर चालित टूल वापरताना मिळणारा वेग आणि शक्ती सर्व मशीनमध्ये सारखी नसते. कोणत्या प्रकारचे हत्यारधारक वापरले आहे त्यावर ते अवलंबून असते. त्यानुसार मोटर वापरली जाते. वापरलेल्या मोटरच्या क्षमतेनुसार टॉर्क मिळतो.
 
काही मटेरियलकरिता किंवा काही अॅप्लिकेशनकरिता त्या टूलसाठी जेव्हा जास्त टॉर्कची आवश्यकता असते, तेव्हा हत्यारधारकामध्ये टॉर्क वाढविण्यासाठी काहीही करता येत नाही. थेट मशीनमधूनच हत्यारधारकाला ड्राइव्ह मिळतो. जेव्हा वेग (स्पीड) कमी असतो तेव्हा जास्तीचा टॉर्क मिळतो. जेव्हा वेग जास्त असतो तेव्हा टॉर्क कमी मिळतो. मोटरसाठी जो ड्राइव्ह असतो तोच वेग टूलला दिला जातो. काही वेळेला जास्तीचा वेग कमी टॉर्कसह अपेक्षित असतो, अशा वेळी आम्ही 1:2 प्रमाणात गिअर वापरतो. म्हणजे मशीनला 100 आर.पी.एम. इतका वेग दिला तर टूलवर 200 आर.पी.एम. वेग मिळतो. अॅल्युमिनिअम असेल तर या मटेरियलला जास्तीचा वेग लागतो. त्यासाठी ड्राइव्ह मोटरची पॉवर वाढविणे शक्य नसते. तेव्हा अशावेळी फीड गुणोत्तर (रेशो) 1:2 दिले जाते. अॅल्युमिनिअमला जास्त टॉर्क लागत नाही. लहान ड्रिल असेल तर, ते टूल अॅल्युमिनिअमवर जास्त वेगाने चालते. त्याला 1:2 असा गिअर रेशोदेखील आपण देऊ शकतो.
चालित हत्यारधारकांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण http://www.sphoorti.com/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
@@AUTHORINFO_V1@@