जलद ड्रिलिंगसाठी कार्बाइड इंडेक्सेबल हेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Jun-2021   
Total Views |
uyhugfhcgx_1  H 
 
उद्योग यशस्वीपणे चालविताना, यंत्रसामग्रीचा जास्तीतजास्त उत्पादक वापर केल्यास संपूर्ण उत्पादनाची किंमत कमीतकमी राखणे आणि त्यामुळे स्पर्धेत अग्रभागी रहाणे शक्य होते. यासाठी कमीतकमी वेळात जास्तीतजास्त यंत्रण करणे हा एक सोपा कानमंत्र आहे. बहुसंख्य यंत्रभागांच्या उत्पादनामध्ये विविध प्रकारच्या भोकांसाठी ड्रिलिंग करणे, आवश्यक असते. वरवर साध्या वाटणाऱ्या या कामामध्ये ड्रिल बोथट होणे, ड्रिल मशीनवरून काढून धार लावणे, पुन्हा ड्रिल बसविताना अचूक यंत्रण होण्यासाठी त्याचे माप नीट घेऊन मग यंत्रण करणे, अशा अनेक कामांमध्ये बराच वेळ वाया जाण्याची आणि उत्पादकता कमी होण्याची अनेक उदाहरणे आहेत. याचबरोबर नेहमीच्या स्टीलच्या ड्रिलचा सरकवेग जास्त ठेवून चालत नाही.
असंख्यवेळा कराव्या लागणाऱ्या या कामामध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी आम्ही कार्बाइड इंडेक्सेबल हेड 'ड्रिलमाईस्टर' (चित्र क्र. 1) विकसित केले आहे.

uyhugfhcgx_1  H 
 
ड्रिलमाईस्टर श्रेणीतील ड्रिल, 6 मिमी. ते 25 मिमी. या आकारात 0.1 मिमी.च्या पटीतील व्यासाची आणि 1.5D, 3D, 5D, 8D तसेच 12D या लांबीमध्ये उपलब्ध आहेत. (यामुळे 1.5 ते 12 पर्यंत L/D गुणोत्तर असलेल्या भोकांचे सहज यंत्रण करता येते.) स्टील, कास्ट आयर्न, स्टेनलेस स्टील अशा विविध प्रकारच्या यंत्रभागांसाठी ही ड्रिल उपयुक्त आहेत.
ड्रिलमाईस्टरचे वैशिष्ट्य म्हणजे, स्टीलपासून बनविलेल्या ड्रिलच्या टोकाला एक नवीन प्रकारचा कार्बाइड इन्सर्ट बसविलेला आहे. या व्यवस्थेमुळे दोन फायदे होतात. स्टीलचे ड्रिल वापरून मिळणारी यंत्रणातील लवचिकता राखली जाते, त्याचबरोबर कार्बाइड इन्सर्टमुळे जास्त सरकवेग ठेवून जास्त वेगाने यंत्रण करता येते. साधारण ड्रिल वापरून, कास्टिंगसारखे भाग यंत्रण करताना सुमारे 0.25 ते 0.30 मिमी./परिभ्रमण एवढा सरकवेग ठेवता येतो. परंतु कार्बाइड इंडेक्सेबल हेड वापरून हेच यंत्रण 0.45-0.6 मिमी./परिभ्रमण इतका सरकवेग ठेवून, म्हणजे जास्त वेगाने सहज करता येते. अर्थातच यामुळे उत्पादकता वाढते. याऐवजी जर पूर्ण कार्बाइड टूल वापरली तर एकूण खर्च वाढतो.
 
hnsgbfV_1  H x
 
या ड्रिलमाईस्टरमुळे टूलची इन्व्हेंटरीदेखील कमी राखणे शक्य होते. एकूण आढावा घेतल्यास असे दिसून येईल की, प्रत्यक्ष यंत्रण करताना एक, स्टोअरमध्ये एक आणि रीग्राइंडिंगसाठी एक अशी कमीतकमी तीन टूल वापरासाठी सज्ज ठेवावी लागतात. या परिस्थितीत संपूर्ण टूलऐवजी फक्त ड्रिलमाईस्टरचे कार्बाइड इंडेक्सेबल हेड स्टॉकमध्ये ठेवून काम करता येते. यंत्रण करताना कार्बाइड इंडेक्सेबल हेड एका चावीच्या साहाय्याने जागेवर बदलता येते. त्यामुळे टूल रीसेटिंग करावे लागत नाही आणि त्यामधील वेळही वाचतो.
 
 
इतर वैशिष्ट्ये
•ड्रिलमाईस्टरच्या मोठ्या हेलिकल अँगलमुळे आणि उच्च दर्जाचे पॉलिश केलेल्या फ्ल्यूट (चित्र क्र. 2) मुळे, यंत्रण करताना चिप लवकर बाहेर सरकते. या व्यवस्थेमुळे विशेषतः 5D, 8D खोली असलेल्या खोल भोकांचे यंत्रण करताना यंत्रभाग खराब होत नाहीत.
•सर्व ड्रिलमाईस्टरचे शँक आकारमानानुसार 16, 20, 25 मिमी. आणि फ्लॅट कॉटर आकाराचे तयार केलेले असल्याने ते विविध पॉवर चक होल्डर आणि कॉलेट चक होल्डरमध्ये सहजपणे बसविता येतात.
•यंत्रण करताना ड्रिलमाईस्टरची फ्लँज, होल्डरला चिकटत (चित्र क्र. 3) असल्याने ऑफसेटची अचूकता राखली जाते.
•बॅक स्टॉपरमुळे यंत्रण करताना सरकवेग जास्त राखता येतो.
 
 
hjghmj_1  H x W 

ड्रिलमाईस्टर वापरताना घ्यावयाची काळजी
•शीतकाचा प्रवाह (फ्लो) आणि शीतकाचा दाब (प्रेशर) योग्य राखा.
•ड्रिलचा रनआउट आणि अलाइनमेंट 0.02 मिमी. मध्ये राखा.
•भोकाच्या व्यासाच्या 8 पट खोल (8D) सारखे खोल यंत्रण करताना शक्यतो आधी भोकाच्या व्यासाच्या 1.5 पट खोल (1.5D) यंत्रण करून घ्या किंवा यंत्रण करताना सुरुवातीला 50% सरकवेग ठेवा.
 
 
ड्रिलमाईस्टरवर कार्बाइड इंडेक्सेबल हेड बसविण्याची पद्धत
या ड्रिलवर इंडेक्सेबल हेड बसविणे आणि काढणे (चित्र क्र. 4) एकदम सोपे आहे. इंडेक्सेबल हेडसाठी दिलेल्या चावीने हेड घट्ट बसविता येते. सर्वसाधारणपणे वापरात असलेले RHS थ्रेडिंग यामध्ये असल्याने बसविणे आणि काढणे या क्रिया सहज करता येतात.

iuyhgf_1  H x W 
 
व्यासातील फरक -0.3/+0.15 आल्यास, भोकाचा पृष्ठीय फिनिश रफ असल्यास, यंत्रण करताना आवाज झाल्यास, शिवाय ड्रिल हेड गरम झाल्यास ड्रिलमाईस्टर बदलावे.

kjkhjgjuyjkk_1   
 
ड्रिलमाईस्टरमध्ये सॉलिड ड्रिलची लवचिकता आणि इंडेक्सेबल ड्रिलची कार्यक्षमता याचे योग्य संयोजन (कॉम्बिनेशन) झाले आहे. यामुळे जास्त उत्पादकता मिळविण्यासाठी ड्रिलिंगमध्ये कार्बाइड टूलचा वापर करण्याऐवजी कार्बाइड इंडेक्सेबल हेड ड्रिल वापरून कमी खर्चात आणि सहज यंत्रण करणे शक्य झाले आहे.
पुण्याजवळील एका कंपनीत व्ही.एम.सी. वर नकल जॉइंट या यंत्रभागाचे यंत्रण करताना, साधारण टूलऐवजी टंगालॉयचे टूल वापरून झालेला उत्पादकतेतील फरक तक्ता क्र. 1 मध्ये दिला आहे. यंत्रणाचा वेळ कमी झाल्यामुळे उत्पादकतेमध्ये वाढ होतानाच टूलचे आयुर्मानही वाढल्याचे लक्षात येते.
 
 
जय शाह टंगालॉय इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
त्यांना या क्षेत्रातील सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे.
9769444547
@@AUTHORINFO_V1@@