डिझेल प्राईमिंग पंपटेस्टिंग मशिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-Aug-2021   
Total Views |
कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करत असताना, प्रत्येक उत्पादनाची तपासणी करणे गरजेचे असते. तपासणी न केल्यास रिजेक्शनचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. डिझेलवर चालणाऱ्या ट्रकमध्ये प्राईमिंग पंप नावाचा एक भाग (पार्ट) असतो. जेव्हा इंजिनातील डिझेलमार्गात हवा अडकते तेव्हा या पंपाच्या साहाय्याने ती हवा काढली जाते. हा पंप हाताने (मॅन्युअली) वापरला जातो. प्रॉडक्शन लाईनमध्ये जेव्हा हे पंप तयार होतात, तेव्हा प्रत्येक पंपाची तपासणी केली जाते. ही तपासणी करण्यासाठी पुण्यातील ’फॅबेक्स इंजिनिअरिंग’ या कंपनीने ग्राहकाच्या मागणीनुसार ’डिझेल प्राईमिंग पंप टेस्टिंग मशिन’ तयार केले. लेखात आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

rfggfsgfg_1  H
जुनी पद्धत
प्राईमिंग पंपाचे उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात साधारणपणे मिनिटाला 1 याप्रमाणे दिवसाला 300 ते 400 डिझेल प्राईमिंग पंप तयार होत असतात. या पंपामध्ये 3 ते 4 प्रकार असतात. या सर्व प्रकारांसाठी वेगवेगळा सेटअप लागतो. तयार झालेल्या सर्व पंपाची चाचणी करणे आवश्यक असते. पूर्वी ती मॅन्युअली केली जात होती. यामध्ये वेळ आणि श्रम यांचे गणित जुळत नव्हते. या प्रक्रियेमध्ये ऑपरेटरला प्रत्यक्षपणे 25 स्ट्रोक्स हाताने मारावे लागत होते. त्यानंतर तो सक्शन केला जायचा. यामध्ये बरेच डिझेल सांडायचे. ऑपरेटर यात गुंतून रहात होता. हे काम दिवसेंदिवस क्लिष्ट होत होते. त्यामुळे वारंवारिता आणि सातत्यपूर्ण अचूकता या दोन्ही गोष्टी मिळत नव्हत्या. या सर्व प्रक्रियेसाठी 5 मिनिटे वेळ लागत होता.
• 3-4 प्रकारचे 300-400 पंप प्रति मिनिट एक या दराने अचूकतेत सातत्य राखून तपासले जाणे
• ग्राहकाला ऑपरेटर थकवा नको होता.
• कंपोनंटच्या हेडला 25 स्ट्रोक्समध्ये 500 मिली डिझेल +/- 30 मिली असे अपेक्षित डिझेल बाहेर येते हे तपासणे महत्त्वाचे होते. म्हणजे त्याची पर स्ट्रोक डिझेल टाकण्याची क्षमता (कॅपॅसिटी) किती आहे याची चाचणी करणे ही ग्राहकाची मुख्य मागणी होती.

fgdfsgdsafgf_1  
नवीन पद्धत
• प्रत्येक प्रकारासाठी मशिनच्या खाचेत अचूक बसेल असे फिक्श्चर तयार केले.
• फिक्श्चरला इनलेट-आऊटलेटजोडण्यासाठी न्युमॅटिक व्यवस्था केली.
• डिझेल टाकण्याची क्षमता मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फ्लो-मीटर वापरला.
• एक सेन्सर लावून पूर्ण हवा बाहेर पडल्यानंतरचे स्ट्रोक मोजून त्यातून येणारे डिझेल मोजणे सुरू केले.
या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी काही इलेक्ट्रिक आणि न्युमॅटिक यंत्रणा वापरून आपोआप योग्य त्या दुरुस्त्या केल्या जातील अशी व्यवस्था केली.

hfghdfdf_1  H x

gfdgdfhdfsgf_1  
 
फायदे
• ही सर्व प्रक्रिया न्युमॅटिक आणि स्वयंचलित केल्यामुळे एक मिनिटापेक्षा कमी अपेक्षित आवर्तन काळ (सायकल टाईम) आम्हाला व्यवस्थित मिळायला लागला.
• या नवीन प्रक्रियेमध्ये केवळ एकच ऑपरेटर असतो. त्याला मॅन्युअली काहीच काम करावे लागत नाही. फक्त तपासणी होत असताना त्यावर लक्ष ठेवणे एवढीच ऑपरेटरची जबाबदारी राहते.
• स्वयंचलित प्रक्रियेमुळे मानवी चुकीला वाव उरत नाही.
• फ्लो मीटरमुळे मोजमापाची अचूकता आणि वारंवारिता या दोन्हींची खात्री मिळायला लागली.
• पोकायोके यंत्रणेमुळे या मशिनवर लाईनमधून जे रिजेक्टेड कंपोनंट येतात ते आपोआपच याठिकाणी सापडतात. उदाहरणार्थ, 25 स्ट्रोकमध्ये 400 मिमी डिझेल आले नाही तर पंपावर पंचिग होत नाही. याचाच अर्थ पंप बरोबर नाही.
• या मशिनद्वारे वेगवेगळे पंप कितीही वेळा तपासता येतात.

प्रसन्न अक्कलकोटकर यांत्रिकी अभियंता असून त्यांना या क्षेत्रातील 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@