अनावश्यक गाइडबुश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    11-Sep-2021   
Total Views |
कारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे .
 

img00_1  H x W: 
 

कदा आमच्या कंपनीत क्रँकशाफ्ट फ्लँजचे यंत्रण आणि शँकवर बाजूची भोके करणाऱ्या मशीनमधून ड्रिलिंग करताना मोठा 'स्क्रीचिंग' आवाज येत असल्याची तक्रार आली. या प्रक्रियेदरम्यान फ्लँजच्या बाजूला 44 मिमी. व्यासाचे स्टेप ड्रिल वापरले जात होते आणि शँकच्या बाजूला 19 मिमी. व्यासाचे ड्रिल वापरले जात होते.

 
यासाठी वर्क टेबल सरकवून (इंडेक्स करून) त्याच मशीनवर त्या भोकांचे फिनिशिंग केले जात होते. यंत्रण बारकाईने बघितल्यावर असे लक्षात आले की, गाइड बुशमधून ड्रिल पुढे जाताना सेंटर ड्रिल केलेल्या अक्षाला अलाइन होत नव्हते. ड्रिल आणि सेंटर ड्रिलचे अक्ष किंचित वेगळे होते. त्यामुळे ड्रिल थोडे वाकून (बेंड) ड्रिलिंग होत होते. हे होताना ड्रिलच्या पृष्ठभागाचे (OD) गाइड बुशच्या आतल्या पृष्ठभागाशी (ID) खूप घर्षण होऊन आवाज येत होता. असेही लक्षात आले की, लेथवर ड्रिलिंग करतानासुद्धा सेंटर ड्रिल करून नंतर मोठ्या आकाराचे ड्रिल सहज करता येते, मग येथे गाइड बुशची काय गरज 
 

img01_1  H x W:
 

सेंटर ड्रिलिंग केलेला क्रँकशाफ्ट

 

त्याप्रमाणे गाइड बुश काढून टाकले आणि लेथ सारखी प्रक्रिया सुरू केली. आवाज पूर्णपणे थांबला! काम करणारी व्यक्ती खुश झाली. त्याला आता इअर प्लग घालायची गरज उरली नाही. ड्रिलचे आयुर्मान वाढले हा अप्रत्यक्ष फायदा झाला तो वेगळाच. कारण ड्रिलची मार्जिन खराब होणे थांबले. गाइड बुश काढल्यामुळे कमी लांबीचे (स्वस्त) ड्रिल वापरता येऊ लागले कारण बुशमध्ये जवळजवळ 50 मिमी. वाया जात होते. यामुळे खर्चातही बचत झाली 
 

IMG02_1  H x W: 
 

गाइड बुश नसलेले ड्रिल

 

निष्कर्ष : यंत्रण प्रक्रिया ठरविताना सेंटर ड्रिल केलेले आहे. त्यातून मुख्य ड्रिल जाऊ शकते या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले होते. प्रक्रिया ठरविताना ही चूक झाल्याने नेहमीप्रमाणे गाइड बुशची सोय केलेली होती, हे टाळता आले असते. कार्यप्रणाली ठरविताना प्रक्रिया आणि कार्यवस्तूच्या गरजांचा विचार बारकाईने करणे जरुरी असते.

 

9225631129

सुरेंद्र दातार यांत्रिकी अभियंते असून, टाटा मोटर्समध्ये 34 वर्षे टूल इंजिनिअरिंग विभागात DGM पर्यंतच्या विविध पदांवर काम करून निवृत्त झाले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@