‘V’ आकाराच्या टूलद्वारे प्रोफाइलिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-Sep-2021   
Total Views |
कार्यवस्तूवरील विशिष्ट प्रोफाइलसाठी V आकाराचा इन्सर्ट वापरून प्रोफाइलिंग किंवा कॉपी करण्याच्या यंत्रणकार्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत .
 

 
 
img00_1  H x W:

 

 
द्योगक्षेत्रामध्ये नवीन कल्पना आणि उत्पादनांचा विकास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, OEM च्या पुरवठादारांसाठी ही एक चांगली बाब आहे. यंत्रभागांच्या डिझाइनमध्ये होणाऱ्या बदलानुसार यंत्रण करणे, उत्पादन करणाऱ्यांना आव्हानात्मक ठरते. यंत्रभागांची भूमिती अधिक क्लिष्ट होत आहे आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. या अडचणींवर मात करण्यासाठी NC मशीनवर योग्य टूलिंग आणि प्रोग्रॅमिंगची निवड करणे, हे खूप महत्त्वाचे आहे. कॉपीइंग, प्रोफाइलिंग (अंतर्गत आणि बाह्य), अंडरकटिंग, अंतर्गत फेसिंग, गोलाकार यंत्रण इत्यादी यंत्रणकार्ये अशी आहेत, जी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक असते. कार्यवस्तूवरील विशिष्ट प्रोफाइलसाठी V आकाराचा इन्सर्ट वापरून प्रोफाइलिंग किंवा कॉपी करण्याच्या यंत्रणकार्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
 

img01_1  H x W: 
 

चित्र क्र. 1

 

कार्यवस्तूच्या ज्या भागात स्टँडर्ड इन्सर्टला प्रवेश मिळणे अवघड असते, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण यंत्रणासाठी 35°, 25° किंवा 15° (विशेष कामासाठी) असे समाविष्ट (इन्क्लुडेड) टिप कोन असलेले V आकाराचे इन्सर्ट वापरले जातात. चित्र क्र. 1 मध्ये इन्सर्टचे आकार दाखविले आहेत. काही यंत्रभागांमध्ये 25° इतका समाविष्ट टिप कोन आवश्यक असतो, तर काही यंत्रभागांमध्ये 15° इतका समाविष्ट टिप कोन असावा लागतो. प्रोफाइलच्या यंत्रणासाठी या प्रकारच्या इन्सर्टचा वापर कसा करायचा, ते आता आपण पाहू.

35° इतका समाविष्ट टिप कोन असलेले इन्सर्ट प्रामुख्याने बाह्य किंवा अंतर्गत प्रोफाइलसाठी वापरले जातात. आपल्याला V आकाराच्या इन्सर्टसाठी योग्य धारकांची (होल्डर) निवड करणेदेखील गरजेचे आहे. बऱ्याच वेळी जिथे प्रोफाइल अतिशय उभ्या चढणीची असते, तिथे स्टँडर्ड 35 अंशाचा टिप कोन असलेला इन्सर्ट यंत्रण करण्यासाठी पोहोचू शकत नाही आणि तेथे अडथळ्यांची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला कमी टिप कोन असलेला (25° किंवा 15°) इन्सर्ट निवडावा लागतो. कोन निवडताना यंत्रणाच्या दृष्टिकोनातून तो इन्सर्ट मजबूत असायला हवा. त्याचे टवके उडू नयेत (चिप ऑफ) किंवा तो तुटू नये याची काळजी घ्यावी लागते. प्रोफाइलच्या शैलीच्या आधारे आपल्याला इन्सर्ट आणि धारक निवडावे लागतात. चित्र क्र. 2 मधील चित्रातून ही गोष्ट आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होईल.

 img02_1  H x W:
 

चित्र क्र. 2

 

यंत्रण करताना इन्सर्ट किंवा धारक (होल्डर) यंत्रभागातील नको असलेल्या ठिकाणी स्पर्श करणार नाही, यासाठी आपल्याला नेहमीच जागरूक असायला हवे. बाह्य कॉपीइंग ऑपरेशनसाठी चित्र क्र. 3 (A, B, C) पहा. बाह्य खाचेवरील (ग्रूव्ह) आकारातील बदलामुळे, आपल्याला धारकांमध्ये इन्सर्टच्या स्थानात बदल करून घ्यावा लागेल. कारण स्टँडर्ड 35 अंशाचा टिप कोन असलेला इन्सर्ट तिथे पोहोचू शकत नाही. D चित्रात दर्शविलेल्या प्रोफाइलचे यंत्रण करताना आपल्याला धारकावर क्लिअरन्सदेखील द्यावा लागेल. चित्र क्र. 3D मध्ये दाखविल्याप्रमाणे, इन्सर्ट आणि धारकावरील जो प्राथमिक क्लिअरन्स आहे, त्यापेक्षा अतिरिक्त क्लिअरन्स द्यावा लागेल, म्हणजे टूल फिरताना कार्यवस्तूच्या प्रोफाइलचा अडथळा येणार नाही.

खोल असणारा फेस आणि अंडरकट यांचे यंत्रण करताना धारकास योग्य अॅप्रोच कोन देण्याची सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. चित्र क्र. 4 मध्ये नमूद केल्यानुसार, कॉपी करणाऱ्या धारकांना फेसपर्यंत पोहोचण्यासाठी कर्तन व्यास आणि कापाची खोली यांच्यात बदल करावे लागतील.

 

img03_1  H x W: 
 

चित्र क्र. 3


img04_1  H x W: 
 

चित्र क्र. 4

 

उदाहरण

चित्र क्र. 5 मध्ये एक गोलाकार प्रोफाइल असलेला यंत्रभाग असून, त्याचा किमान व्यास (Dmin) D28-D40 आहे. तसेच त्यात LU इतक्या खोलीपर्यंत अंतर्गत सपाट फेस असलेले बोअर आहे. यासाठी आपल्याला येथे योग्य क्लिअरन्स असलेला आणि अॅप्रोच कोन तसेच इन्सर्टच्या कोपऱ्याचा समाविष्ट कोन, योग्यरीतीने डिझाइन केलेला धारक निवडणे गरजेचे आहे. म्हणून, 60° अॅप्रोच कोन आणि 25° समाविष्ट कोन असलेल्या इन्सर्टची निवड केली आहे. आपण गोलाकार अंतर्गत प्रोफाइल आणि सपाट फेस असलेले बोअर यांचे यंत्रण दोन प्रकारे करू शकतो.

 

img05_1  H x W: 
 

चित्र क्र. 5

 

1.प्री-ड्रिलिंग ऑपरेशनशिवाय अंतर्गत गोल मिळविण्यासाठी आपण आणखी यंत्रण करू शकतो. या यंत्रणाचे टप्पे चित्र क्र. 6 मध्ये दाखविले आहेत. चित्र क्र. 6 मध्ये दाखविल्याप्रमाणे, सुरुवातीला 25 अंशाचा समाविष्ट कोन असलेला R0.4 कॉर्नर इन्सर्ट वापरून 0.5 इतकी कापाची खोली (डेप्थ ऑफ कट) असलेले पास निवडावे. पासची संख्या बाणाच्या चिन्हाने दाखविली आहे. पासची संख्या जास्त असल्यामुळे ही जास्त वेळ घेणारी प्रक्रिया आहे. 0.5 अशी कापाची खोली ठेवून फेसिंग करून आणि दाखविल्यानुसार पासची संख्या वापरून अंतर्गत फेस तयार करणेदेखील शक्य आहे. अंतर्गत फेसचे यंत्रण करताना 0.05 मिमी./परिभ्रमण इतका सरकवेग ठेवावा.

 

img06_1  H x W: 
 

चित्र क्र. 6

 

1.प्रीड्रिलिंगसह : या प्रकारात अंतर्गत प्रोफाइल तयार करण्यासाठी यंत्रणाचे पहिले ऑपरेशन ड्रिलिंग असते. यात सुरुवातीला एक छिद्र ड्रिल केले जाते आणि त्यानंतर चित्र क्र. 7 मध्ये दर्शविल्याप्रमाणे अंतर्गत गोलाकार प्रोफाइल किंवा एकाधिक पास वापरून अंतर्गत फेस तयार केला जातो. ही पद्धत पहिल्या पध्दतीपेक्षा चांगली आहे, कारण यात ड्रिलिंग ऑपरेशनद्वारे जास्तीतजास्त मटेरियल काढले जाते आणि यंत्रणाला लागणारा एकंदर वेळ कमी असतो. अंतर्गत फेसिंगदरम्यान 0.05 मिमी./परिभ्रमण असा सरकवेग ठेवावा.

 

img07_1  H x W: 
 

चित्र क्र. 7

 

गोलाकार यंत्रण आणि अंतर्गत फेसिंग करताना चित्र क्र. 7 आणि 8 मध्ये दाखविल्याप्रमाणे अंतिम फिनिशिंग पास घ्यावा. अंतर्गत फेसिंग ऑपरेशनमध्ये आपल्याला दोन चरणात प्रक्रिया करावी लागेल. प्रथम चरण म्हणजे अंतर्गत फेसचे फिनिशिंग आणि दुसरे चरण फेसच्या कोपऱ्यापाशी पोहोचेपर्यंत अंतर्गत बोअरिंग.

 

अंतर्गत गोलाकार किंवा अंतर्गत फेसचे यंत्रण करताना

 

img08_1  H x W: 
 

चित्र क्र. 8


(
चित्र क्र. 8) प्रोग्रॅम केलेल्या टूल मार्गामध्ये (पाथ) केंद्रीय अक्ष पार केला जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, अन्यथा इन्सर्ट तुटेल किंवा त्याचे टवके उडतील.

चित्र क्र. 9 मध्ये दर्शविलेल्या टूल मार्गाच्या दिशेने अंतर्गत फेसिंगची यंत्रण प्रक्रिया शक्य आहे.

 

img09_1  H x W: 
 

चित्र क्र. 9

 

चित्र क्र. 10 आणि 11 मध्ये दाखविल्याप्रमाणे अंतर्गत कॉपीइंग ऑपरेशन करताना, आपण कापाची खोली ap कोपऱ्याच्या त्रिज्येइतकी (RE) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली पाहिजे. जर इन्सर्ट कोपऱ्याच्या त्रिज्येपेक्षा ap जास्त असेल, तर बर निर्माण होऊ शकते.

 

img10_1  H x W: 
 

चित्र क्र. 10 : D28 गोलाकार प्रोफाइल यंत्रणाचे उदाहरण

 

img11_1  H x W: 
 

चित्र क्र. 11

 

यंत्रभागाची क्लिष्ट भूमिती लक्षात घेऊन योग्य टिप कोन असलेला इन्सर्ट आणि सुयोग्य हत्यार धारक निवडल्यास प्रोफाइल यंत्रण सुलभ होते.

 

9579352519

विजेंद्र पुरोहित हे टूलिंगमधील तज्ज्ञ आहेत. त्यांना मशीन टूल आणि कटिंग टूल डिझाइनमधील जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@