फॉर्म आणि प्रोफाइलसाठी टूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Sep-2021   
Total Views |
टर्निंग प्रक्रियेमधील सामान्य यंत्रणाच्या तुलनेत फॉर्म अथवा प्रोफाइलचे यंत्रण करताना, त्यातील क्लिष्ट भूमितीमुळे, टूलची निवड अतिशय महत्त्वाची ठरते. फॉर्ममध्ये अपेक्षित असलेले आकार मिळविण्यासाठी त्या जागी टूलचा विनाअडथळा संपर्क होणे, हे यामधील प्रमुख आव्हान असते. बाहेरील आणि त्याचबरोबर आतील पृष्ठभागावरील प्रोफाइलचे सक्षमपणे यंत्रण करणाऱ्या, विशिष्ट भूमिती असलेल्या टूलविषयी या लेखात सविस्तर माहिती वाचावयास मिळेल .
 
IMG1_1  H x W:
 
र्निंगमध्ये जर आपल्याला फॉर्मची निर्मिती करावयाची असेल तर दोन प्रकारे तयार करता येऊ शकते. एक प्रकार म्हणजे सिंगल पॉइंट टूलद्वारे यंत्रण, तर दुसरे म्हणजे टूल थेट आतमध्ये (डायरेक्ट प्लंजिंग) घुसविणे. प्लंजिंग प्रक्रियेमध्ये यंत्रभागावर अपेक्षित असलेला फॉर्म तयार करण्यासाठी इन्सर्टवर तसा फॉर्म विकसित करून टूलद्वारे थेट आतमध्ये घुसवून प्लंजिंग केले जाते. प्लंजिंगमुळे आवर्तन काळ कमी होण्यास मदत होते. अपेक्षित फॉर्म तयार करण्यासाठी यंत्रण प्रक्रियेद्वारे लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत प्लंजिंग प्रक्रियेद्वारे खूप कमी वेळ लागतो, मात्र प्लंजिंगमध्ये भार आणि यंत्रणाची बलेदेखील वाढतात. हे सहन करण्यासाठी क्लिअरन्स आणि टूलची भूमिती योग्यप्रकारे विकसित करावी लागते. 
 

IMG01_1  H x W: 
 

चित्र क्र. 1 : स्क्रू ऑन प्रकारचे इन्सर्ट

 

 

फॉर्मचे प्रकार

फॉर्मचे अंतर्गत (इंटर्नल) आणि बाह्य (एक्स्टर्नल) फॉर्म असे दोन प्रकार असतात. प्लंजिंग प्रक्रिया ही बहुतांशी बाह्य फॉर्मसाठी वापरली जाते. अंतर्गत प्लंजिंग प्रक्रिया अपवादात्मक परिस्थितीत वापरता येते. आम्ही विकसित केलेल्या SPGN टूलमध्ये (चित्र क्र. 1) एक ब्लँक दिली जाते. त्यात इन्सर्टची लांबी (इंचामध्ये) CW दाखविलेली आहे. फॉर्मच्या आकारानुसार योग्य लांबीचा इन्सर्ट निवडता येतो. अचूकपणे फॉर्म तयार करण्यासाठी इन्सर्टवर अतिरिक्त मटेरियल दिले आहे. या फॉर्मवर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म तयार करू शकतो. इन्सर्टचे मटेरियल कार्बाइड असून त्याची शँक स्टीलची आहे. 8 मिमी. ते 25 मिमी. लांबीपर्यंतचे इन्सर्ट मिळू शकतात. यांची जाडी 0.15" ते 0.25" इतकी आहे. स्टील, स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न, नॉन फेरस मटेरियल, सुपर अलॉय आणि कठीण (हार्ड) मटेरियलवर याचा वापर केला जातो. सुपर अलॉयमध्ये यंत्रण भार अधिक असल्यामुळे यंत्रण सुलभ होत नाही. हे इन्सर्ट केवळ टर्निंग मशीनवरच वापरू शकतो. 7 ते 7.5 kW शक्तीपेक्षा जास्त शक्ती असलेल्या मशीनच या प्लंजिंग कामासाठी वापरणे योग्य ठरते. कारण, पूर्ण प्लंजिंगदरम्यान येणाऱ्या भाराला सहन करण्यासाठी अधिक शक्ती असलेल्या मशीन वापरणे केव्हाही फायदेशीर ठरते.

 

IMGT1_1  H x W: 
 

तक्ता क्र. 1 : PSGM, PSGB इन्सर्टच्या वापरासाठीचे तपशील

 

चित्र क्र. 2 मध्ये दाखविलेल्या टूलवर चिप ब्रेकर स्पून दिलेले आहेत. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे PSGM आणि दुसरा PSGB. PSGB म्हणजे ब्लँक. PSGM हे केवळ खाचेसाठी (ग्रूव्ह) वापरण्यात येते. प्रोफाइल यंत्रण करताना PSGB इन्सर्ट वापरले जातात.

 

IMG02_1  H x W: 
 

चित्र क्र. 1 : PSGM, PSGB इन्सर्ट

 

 

 

अंतर्गत फॉर्म

सर्वसाधारण बोरिंग टूलसारखेच तयार केलेले हे प्लंजिंग टूल चित्र क्र. 3 आणि 4 मध्ये दाखविले आहे. यात केवळ टूलच्या पुढे आणि मागे हालचाल (DMIN) देण्यात आलेली आहे. यात 1 मिमी. चा व्यास (CW) देण्यात आलेला असून 5 मिमी. चा प्रोफाइल तयार केला आहे. हे संपूर्ण टूल सॉलिड कार्बाइडमध्ये असून ते अखंड आहे. हे मुख्यतः छोट्या यंत्रभागांसाठी वापरले जाते. छोट्या यंत्रभागांमध्ये आतमध्ये जर प्रोफाइल तयार करावयाची असेल, तर इंडेक्सेबल टूल वापरता येत नाही. त्यासाठी यामध्ये आम्ही संपूर्ण कार्बाइडच्या टूलचा वापर करतो. या टूलच्या साहाय्याने प्रोफाइलिंग करण्याबरोबरच बोरिंग, थ्रेडिंग, ग्रूव्हिंगदेखील करणे शक्य आहे. प्रोफइलमध्ये टूल थेट प्लंज केले, तर केवळ व्यासाएवढाच प्रोफाइल तयार करता येईल. पण जर 5 मिमी. व्यासाचा प्रोफाइल करावयाचा असेल, तर टूलची तशी हालचाल करून तो प्रोफाइल करता येईल. हे काम त्या आकाराचे टूल वापरूनसुद्धा एका प्लंजमध्ये करता येणे (जसे ग्रूव्हिंगमध्ये केले जाते) शक्य आहे. पण जर जास्त लांबीचे टूल असेल, तर त्यावर भार घेता येणार नाही आणि ते टूल तुटणार. कारण हे टूल अगदी लहान टूल आहेत.

 

IMG03_1  H x W: 
                         
चित्र क्र. 3
 

img1_1  H x W:  
 
चित्र क्र. 4

 

या टूलला आम्ही थ्रू कूलंट होल दिलेले आहे. याला मशीनमध्ये बसणारी एक स्लीव्ह असते. मशीन, स्लीव्ह आणि टूल यातून शीतकवहन होते. शीतकाचा दाब जेवढा जास्त तेवढ्या अधिक सुलभपणे चिप बाहेर येण्यास मदत होते.

या टूलची भूमिती स्टँडर्ड असते. मात्र, जर थ्रेडिंग असेल तर त्याप्रमाणे टूलला आट्यांचा (थ्रेड) आकार दिलेला असतो. तसे नसेल तर, आम्ही मानक (स्टँडर्ड) त्रिज्येचे टूल पुरवितो. या एकाच टूलने बॅक फेसिंग, बोरिंग आणि चॅम्फर, टर्निंग आणि अंतर्गत व्यास करण्यासारख्या प्रक्रिया करणे शक्य आहे. त्या दृष्टीनेच टूलची भूमिती विकसित करून देण्यात आलेली आहे. याची लांबी 15 मिमी. तसेच याला 30 अंशाचा कोन देण्यात आलेला आहे. JBR R हे टूल आतील खाच करण्याकरिता तर JBB R हे टूल आतील बाजूचा वेगळा आकार तयार करण्यासाठी वापरले जाते. यालादेखील थ्रू कूलंट देण्यात आलेले आहे.

DTA टूल (चित्र क्र. 5) केवळ अॅल्युमिनिअमसाठी विकसित केलेले टूल आहे. दुचाकी किंवा चारचाकीच्या अलॉय व्हीलचे वेगवेगळे फॉर्म तयार करण्यासाठी या टूलचा वापर केला जातो. यामध्ये 6 मिमी. आणि 8 मिमी. चा व्यास देण्यात आलेला आहे. हा कोटेड इन्सर्ट असून यामध्ये विविध ग्रेड उपलब्ध असल्याने या इन्सर्टचा वापर बऱ्याचशा मटेरियलसाठी करता येऊ शकतो. यालादेखील थ्रू कूलंट देण्यात आलेले आहे. यामुळे चिप इन्सर्टजवळ चिटकून रहात नाहीत. याचा वापर मुख्यतः अॅल्युमिनिअम व्हीलच्या प्रोफाइलिंगसाठी केला जातो.

 

IMG05_1  H x W: 
 

चित्र क्र. 5 : DTA टूल

 

DTA लेपन (कोटिंग) केलेले इन्सर्ट अॅल्युमिनिअमसाठी वापरतात. त्यामुळे टूलची कडा जेवढी टोकदार (शार्प) करू तेवढे जास्त चांगले. लेपन केल्यानंतर ती कड जराशी बोथट (ब्लंट) होते. त्यामुळे या टूलला लेपन केले जात नाही. ते ग्राइंड करून थेट वापरले जाते. त्यामुळे मटेरियल याला चिटकत नाही. हे टूल 800 ते 1000 मीटर/मिनिट अशा उच्च पॅरामीटरवर चालू शकते. त्यामुळेदेखील मटेरियल चिटकण्याची शक्यता कमी होते.

 

उदाहरण (तक्ता क्र. 2)

यंत्रभागाचा तपशील : अलॉय व्हील

मटेरियल : अॅल्युमिनिअम

प्रक्रियेचा प्रकार : 15° प्रोफाइल यंत्रण

मशीन आणि टूलचा प्रकार : फेमको

भक्कमपणा : चांगला

शीतकाचा प्रकार : WET वॉटर सोल्युबल

शीतकाची पद्धत : बाह्य फ्लड

 

IMG06_1  H x W: 
 

तक्ता क्र. 2 : योग्य टूल वापरून होणारे फायदे दाखविणारा तक्ता

 

9769444547

जय शाह टंगालॉय इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना या क्षेत्रातील सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे.

 
 

 

 
 
 

 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@