वायुमापन

04 Jul 2017 15:54:40
 
Aerodynamics
 
दोन आणि चार चाकी वाहनांसाठी लागणारे यंत्रभाग दरमहा हजारोंच्या संख्येने बनतात. ते उत्तम गुणवत्तेचे बनवावे लागतात आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी ते बहुतेक वेळा 100% तपासावे लागतात. तपासणी केल्यानंतर आकड्यांची नोंदही ठेवावी लागते.
 
मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यासाठी ’एअर गेजिंग-वायुमापन’ ही एक उत्तम पद्धती आहे. या पद्धतीने 10 मायक्रॉनपेक्षा कमी टॉलरन्स असलेली मापेदेखील सहजतेने आणि वेगाने मोजता येतात. जरूर असेल त्याठिकाणी लघुत्तम वाचन (लीस्ट काऊंट) 1/10 मायक्रॉन इतके छोटेदेखील असू शकते. तपासणीची नोंद ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दाबदर्शक वापरून त्याचे निकाल संगणकावर भरून ठेवता येतात.
 
वायुमापनामागची शास्त्रीय बैठक

Primary circuit of aerodynamics 

Principle of aerodynamics 
 
वायुमापन पद्धती ही वायुदाब आणि वायुप्रवाह या संबंधीच्या निसर्गनियमांवर आधारलेली आहे. वरील चौकटीत याच्या कार्यपद्धतीची थोडक्यात माहिती दिलेली आहे.
 
चित्र क्र.1 मध्ये वायूमापनासाठी वापरले जाणारे प्राथमिक सर्किट दाखवले आहे. हवेच्या पाइप लाईनमधून घेतलेली हवा दाब नियंत्रकामधून पाठवून तिचा दाब हव्या त्या पातळीला नियंत्रित करून घेतला जातो. ही हवा रोधकामधून वाहते आणि नॉझलमधून बाहेर पडून वातावरणात जाते.

Types of aerodynamics 
 
जेव्हा नॉझलचे तोंड एखाद्या अडथळ्यामुळे पूर्णपणे बंद असते, तेव्हा नॉझलमागचा हवेचा दाब ’नियंत्रित’ दाबाएवढा असतो. अडथळा तोंडापासून हळू हळू दूर नेत गेल्यास नॉझलमधून बाहेर पडणारा हवेचा प्रवाह वाढत जातो आणि त्याचवेळी नॉझलमागचा हवेचा दाब (प्रतिदाब - बॅक प्रेशर) कमी कमी होत जातो. हा प्रतिदाब दाबदर्शकावर पाहता येतो.
 
अडथळा आणि नॉझल यामधील अंतरावर हवेचा प्रवाह अवलंबून असतो आणि हवेच्या प्रवाहावर प्रतिदाब अवलंबून असतो. यंत्रणेच्या रचनेवर अवलंबून, अंतरातील एक दशांश मायक्रॉनचा बदलही प्रतिदाबात मोजण्याइतका बदल घडवून आणू शकतो.
 
sathe@pragatiautomation.com
मशीन टूल डिझाइनमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले अशोक साठे बंगळुरू येथील प्रगति ऑटोमेशनचे चेअरमन तसेच एस मायक्रोमॅटिक समूहाचे वरिष्ठ संस्थापक सदस्य आहेत. भारताच्या एकूण मशीन टूल उत्पादनामध्ये या समूहाचा वाटा 25 टक्के आहे.
Powered By Sangraha 9.0