सर्व बाजू कठीण असलेला मॅग्नेटिक व्ही ब्लॉक

04 Aug 2017 18:21:13
नेहमीच्या वापरातील यांत्रिकी पकड साधने (कन्व्हेन्शनल मेकॅनिकल वर्क होल्डिंग डिव्हाईसेस) वापरून त्यांना कार्यवस्तू पकडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी चुंबकीय तंत्रज्ञान वापरता येते. मॅग्नेटिक वर्क होल्डिंगमध्ये अनेक प्रकार आहेत. मुख्यत: तपासणी (इन्स्पेक्शन), यंत्रण (मशिनिंग) आणि उचलण्यासाठी (लिफ्टिंग) चुंबकीय पकड साधने वापरली जातात. ‘व्ही ब्लॉक’ हे उपकरण या क्षेत्रातील सर्व लोकांची मूळ गरज असणारे उपकरण आहे. केवळ तपासणीलाच नाही तर जॉबवर इतर कामे करण्यासाठी, त्याला पकडण्यासाठीही अशा वेगवेगळ्या ठिकाणी ‘व्ही ब्लॉक’चा वापर केला जातो.

cdvdvdcv_1  H x 
 
व्ही ब्लॉकचे प्रकार
व्ही ब्लॉकमध्ये मॅग्नेटिक व्ही ब्लॉक आणि नॉन मॅग्नेटिक व्ही ब्लॉक असे 2 प्रकार असतात. नॉन मॅग्नेटिक व्ही ब्लॉकमध्ये कार्यवस्तू क्लँप्सने आवळून पकडली जाते आणि तपासली जाते.
मॅग्नेटिक व्ही ब्लॉक
सुरुवातीच्या काळात पूर्ण साध्या लोखंडाच्या ब्लॉकबरोबर मॅग्नेटची ॲसेम्ब्ली करून बनविलेल्या व्ही ब्लॉकचे मटेरिअल मऊ (सॉफ्ट) होते. प्रिसिजन कामात, स्टँडर्ड रुममध्ये एकसारख्या व्यासाची/ आकाराची कार्यवस्तू तपासली जाताना कालांतराने ब्लॉकच्या पृष्ठभागावर चरे (लाईनमार्क) येऊन खड्डे पडायला लागायचे. तपासणी करणाऱ्याच्या ते लक्षात येईपर्यंत कार्यवस्तू पुढे लाईनवर गेल्यानंतर नाकारली (रिजेक्ट) जायची. त्यामुळे हार्डन व्ही ब्लॉकची संकल्पना विकसित झाली. उत्पादकांनी व्ही ब्लॉकमधील मोठ्या ब्लॉकची कठीणता वाढविण्यासाठी त्या भागामध्ये अरल्डाईटच्या मदतीने हार्डन पट्टी चिकटवून प्रिसिजन कामासाठी किंवा तपासणीच्या कामासाठी तिला फिनिश ग्राईंडिंग केले. व्ही ब्लॉक लेग्जच्या ठिकाणी होणारी झीज/मोडतोड टाळण्यासाठी त्यालाही हार्डन पट्टी चिकटवायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने भारतामध्ये हार्डन मॅग्नेटिक व्ही ब्लॉक ही संकल्पना (म्हणजे मोठा व्ही आणि लेग्ज बॉटम हार्डन) अस्तित्वात आली.
पुढे त्याच्यावर काम करताना होणारी आदळआपट किंवा त्याच्या शेवटच्या बाजूला काही धडकले तर पट्टी निघून येण्याची समस्या येते. एक जरी पट्टी निघाली तर व्ही ब्लॉक वाया जातो. पट्टी पातळ असल्याने स्क्रूने घट्ट पकडता येत नाही हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे, स्क्रूईंग केल्यानंतर ती पट्टी निघणार नाही, मात्र अचूकतेमध्ये त्याची 100% समतलता आणणे आणि कायमस्वरूपी राखणे अवघड आहे.
पट्टी निघाल्यानंतरसुद्धा ती पूर्ण निघालेली नसते. खालचा किंवा बाजूचा थोडा जरी भाग (पोर्शन) निघाला आणि एअर गॅप आली तर ती पट्टी तपासणीच्या वेळेला मायक्रॉनमध्ये दबते. कार्यवस्तू काढली की पूर्वस्थितीला येते. कार्यवस्तूमध्ये एरर वाढायला लागते. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यामुळे गुणवत्ता (क्वालिटी) विभागामध्ये तज्ज्ञ लोकांनी संशोधन केल्यानंतर व्ही ब्लॉकवरील पट्टीवर सूक्ष्म भेग (क्रॅक) येऊन 2 मायक्रॉनची एरर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही एरर काढण्यासाठी आम्ही संशोधन केले आणि त्यातील पट्टी वगळून टाकण्याच्या पर्यायावर काम केले. त्यातून ‘ऑल साईड्स हार्डन्ड अँड ग्राऊंड’ या नवीन प्रकारच्या व्ही ब्लॉकच्या उत्पादनाला सुरुवात झाली.
सर्व बाजू हार्डन केलेला व्ही ब्लॉक
नवीन प्रकारामध्ये मोठया व्ही बरोबरच छोटा व्हीदेखील हार्डन झालेला असल्याने छोट्या पिन्स किंवा छोटे जॉब तपासण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला लागला आहे. नेहमीच्या हार्डन व्ही ब्लॉकपेक्षा याचे आयुष्य कमीत कमी 40-50% जास्त मिळते. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे जुन्या पद्धतीच्या हार्डन व्ही ब्लॉकच्याच किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.
संदेश शहा अपटेक इंजिनिअरिंग कंपनीचे मालक आहेत. 
info@uptechengineering.com
Powered By Sangraha 9.0