पीव्हीसी स्लीव्ह अचूक कापणे

05 Aug 2017 15:49:11

काम करणाऱ्या कामगाराला सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले तर अगदी सोपे बदल करून तो कामाचा वेळ तर वाचवतोच पण उत्पादनाची गुणवत्ताही वाढवतो. पुण्यातील ’टेक्नो स्किल इंजिनिअरिंग वर्क्स’मध्ये रोलरवर पीव्हीसी स्लीव्ह बसविण्याचे काम चालते. या कामात त्यांनी काय सुधारणा केली ते आपण पाहणार आहोत.

fgfgbggb_1  H x 




fgfgbggb_1  H x
 
पीव्हीसी स्लीव्ह कापण्याची जुनी पद्धत
• पीव्हीसी पाईप पकडून त्यातून हव्या त्या लांबीची स्लीव्ह हॅक सॉने कापणे.
• रोलरवर पीव्हीसी स्लीव्हचे आवरण करण्यापूर्वी स्लीव्ह दबली जाऊ नये किंवा तिचा आकार बदलला जाऊ नये यासाठी तिच्या तोंडाजवळ मॅँड्रिल घुसविले जाणे.
• पीव्हीसी स्लीव्हच्या तोंडाजवळ मॅँड्रिल बसविल्यानंतर ती स्लीव्ह लेथ मशिनवर पकडून फेसिंग आणि चँपरिंग करणे.
• स्लीव्ह रोलरवर बसविणे


यातील अडचणी
• लेथ मशिनवर टूलने फेसिंग करताना स्लीव्हचे तोंड खडबडीत असल्याने त्यात टूल अडकून स्लीव्हला तडे जात होते.
• या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा पकडण्याचे बल कमी अधिक होत असल्याने स्लीव्हला अनेकदा तडे जात होते. तसेच आकार बदलत होता.
• फेसिंग आणि क्लॅँपिग अचूक नसल्यामुळे प्रत्येकी 10 स्लीव्ह मागे 4 स्लीव्ह खराब येत होत्या. तसेच हॅक सॉने स्लीव्ह
कापल्यामुळे त्यात अचूकता अजिबात दिसत नव्हती आणि कडा धारदार येत नव्हत्या.
• परिणामी पीव्हीसी स्लीव्हच्या आतमध्ये रोलर व्यवस्थित बसविला जात नव्हता.


या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ आणि कच्चा माल वाया जात असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी पीव्हीसी स्लीव्ह कापण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासू लागली. पीव्हीसी स्लीव्हचा आकार न बदलता ती कापली जाणे आणि पीव्हीसी स्लीव्हला तडे न जाणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे साध्य करायची होती. यासाठी लेथ मशिनवरच कट ऑफ व्हील बसविण्याचा प्रयोग करण्याचे ठरले.


fgfgbggbgbggb_1 &nbs
 
नवीन पद्धत
• पीव्हीसी पाईप लेथच्या चकमध्ये बसविणे.
• हवा तेवढ्या अंतरावर टेल पोस्टवर रिव्हॉल्व्हिंग सेंटर पक्का बसविणे.
• पाईप सेंटर आणि चकमध्ये पाईप पकडणे
• टूल पोस्टवर लावलेल्या कटरने पाईप कापून हव्या त्या आकाराचा तुकडा करणे.
• चकची पकड सैल करून पाईप सेंटरपर्यंत पुढे सरकविणे.
• कापलेल्या कडा साफ करणे.
• स्लीव्ह रोलरवर चढविणे.


fgfdbgfgb_1  H



लेखक ’टेक्नो स्किल इंजिनिअरिंग वर्क्स’चे मालक आहेत.
tskill9@hotmail.com
Powered By Sangraha 9.0