पार्टिंग ऑपरेशन

19 Dec 2018 14:27:17
 
uy
बारमधून अपेक्षित लांबीचा तुकडा कापून काढण्याच्या पद्धतीला पार्टिंग म्हणतात. पार्टिंगसाठी लेथवरील चकमध्ये बार घट्ट पकडलेला असणे गरजेचे असते. बार कापण्यासाठी ब्लेडसारखे दिसणारे एक विशेष टूल वापरले जाते, ज्याला पार्टिंग टूल असे म्हणतात. पार्टिंग ऑपरेशन कसे होते हे चित्र क्र. 1 मध्ये दाखविले आहे.

uy
पार्टिंग करण्याची पद्धत
सामान्यपणे लंबगोलाकार कार्यवस्तूचे तुकडे करण्यासाठी पार्टिंग केले जाते. ही कार्यवस्तू 8, 10, 12 फूट किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचा गोल बार असतो. पार्टिंगसाठीचे यंत्रण (कटिंग) करताना ते बहुतांशी ग्रुव्हिंगप्रमाणेच असते. काही ठिकाणी याला ग्रुव्हिंगचे एक्सटेन्शन असेही म्हटले जाते. पार्टिंगमध्ये पुढील दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
1. यंत्रणातून निघणाऱ्या चिपचे नियंत्रण आणि त्यांची विल्हेवाट.
2. शीतकाचा (कुलंट) उपयोग.
पार्टिंग टूल

uy

uy
ब्लेडच्या आकाराच्या टूलच्या तळाशी दोन्ही बाजूला क्लिअरन्स असलेला कार्बाईड इन्सर्ट असतो. टूलची कर्तन कडा (कटिंग एज) वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध असते. चित्र क्र. 3 मध्ये सध्या उपलब्ध असलेले टूल एंडचे 3 प्रकार दाखविलेले आहेत.
सर्वसाधारणपणे पार्टिंग ऑपरेशनसाठी एकच टूल वापरले जाते, ज्यामुळे सेटअपचा वेळ वाचण्यास मदत होते. यंत्रण चालू असताना शीतक पुरवठा सतत चालू असला पाहिजे. या ऑपरेशनसाठी पाण्यात विरघळणारे शीतक सर्वात उत्तम असून, त्याचे प्रमाण पुढे दिले आहे. एक भाग विरघळणारे तेल आणि 15 ते 20 भाग पाणी असे ते प्रमाण असले पाहिजे. हे शीतक बारवर अधिक दाबाने पडणे गरजेचे असते.

uy

uy
टूल ॲप्रोच मोशन
प्रोग्रॅम तयार करण्यासाठी पुढील पायऱ्या विचारात घ्याव्या लागतात.
1. पार्ट-ऑफ टूल निवड.
2. इन्सर्टची निवड.
3. टूल संदर्भ बिंदूचे (रेफरन्स पॉईंट) स्थान.
प्रोग्रॅम
03702 पार्ट-ऑफ (टूल कड डावीकडील बाजू)
...
N120 G50 S1250 T0800 M42
N121 G96 S350 M03
N122 G00 X 2.65 Z-2.0 T0808 M08
N123 G01 X - 0.03 F0.004
N124 G00 X 2.65 M09
N125 X 5.5 Z 2.0 T0800
N126 M30
%
प्रोग्रॅम
03702A पार्ट-ऑफ (टूल कड उजवीकडील बाजू)
...
N120 G50 S1250 T0800 M42
N121 G96 S350 M03
N122 G00 X 2.65 Z - 1.875 T0808 M08
N123 G01 X - 0.03 F0.004
N124 G00 X 2.65 M09
N125 X 5.5 Z 2.125 T0800
N126 M30
%

uy
वरील दोन्ही प्रोग्रॅममध्ये N122 आणि N125 या ब्लॉकची तुलना केल्यास Z अक्षाचे मूल्य (व्हॅल्यू) बदलले आहे. त्याउलट X अक्ष असून, त्यावरून टूल टिपची यंत्रण बाजू दिसते. टूल कडेची डावीकडील बाजू घेऊन केलेल्या प्रोग्रॅममध्ये Z पोझिशनमध्ये इन्सर्टची रुंदी मिळवावी लागते. चित्र क्र. 6 मध्ये व्यासाकडे पार्टिंग ऑपरेशन सुरू करताना कार्यवस्तुच्या संदर्भाने टूलची योग्य आणि अयोग्य जागा दाखविली आहे.

स्टॉक अलाऊन्स
पार्ट-ऑफ ऑपरेशन करताना सर्व यंत्रण पूर्ण झाले आहे, असे होत नाही. काही वेळेला पार्ट-ऑफ म्हणजे पहिले ऑपरेशन असू शकते आणि त्यापुढील जास्त काम यंत्रण झालेल्या भागावर असू शकते. अशावेळी जास्त मटेरियल शिल्लक ठेवावे लागते. साधारणपणे 0.3 मिमी. ते 0.5 मिमी. एवढे मटेरियल ठेवणे फायदेशीर ठरते. अशावेळी N122 ब्लॉक दोन्ही प्रोग्रॅममध्ये बदलावा लागेल. उदाहरणार्थ, पहिल्या प्रोग्रॅमसाठी (03701) Z - 2.0 पासून Z - 2.01 आणि दुसऱ्या प्रोग्रॅमसाठी Z - 1.875 पासून Z - 1.895. तसेच N122 मधील X मूल्य X 2.65 आहे. त्यामुळे 0.125” इतका क्लिअरन्स ø2.400 वर राहील. वरील उदाहरणात बारचा व्यास 2.5” आणि प्रत्यक्ष क्लिअरन्स 0.075” बारच्या प्रत्येक बाजूला राहील.
 
टूल रिटर्न मोशन
पार्टिंग पूर्ण झाल्यानंतर टूल, टूल बदलण्याच्या जागेवर (टूल चेंज पोझिशन) घेण्याचे काम टूल रिटर्न मोशनमध्ये होते. वरील प्रोग्रॅममधील N124 ब्लॉक टूल रिटर्नसाठी पुढीलप्रमाणे लिहिता येईल.
N124 G00 X 5.5 Z2.0 (किंवा X2.125) T0800 M09
प्रथम X अक्षामध्ये रिटर्न करा. हे स्थान बारच्या व्यासाच्या वर हवे.
 
चॅम्फरसह पार्ट-ऑफ
पार्ट-ऑफ टूल वापरून जेव्हा यंत्रण पूर्ण करायचे असते, त्यावेळी उत्कृष्ठ दर्जाचा पृष्ठीय फिनिश यायला हवा. पृष्ठीय फिनिश चांगला येण्यासाठी टोकदार कोपरे मोडले जाणे (चॅम्फर) आवश्यक असते. वरील उदाहरणात X2.4 आणि Z-1.875 या छेदबिंदुला टोकदार कोपरा आहे. साधे टर्निंग टूल जर टोकदार कोपरे काढू शकत नसेल, तर पार्ट-ऑफ हा पर्याय चांगला ठरू शकतो. या पार्ट-ऑफमध्ये चॅम्फर यंत्रण करताना योग्य प्रोग्रॅम बांधणीसाठी काही मार्गदर्शक तत्वे पुढे दिली आहेत. (चित्र. क्र. 7)


uy
1. नियमित (रेग्युलर) पार्ट-ऑफ Z स्थानाच्या (पोझिशन) पुढे टूल घेऊन Z अक्षावर जागा निश्चित करा.
2. पार्ट-ऑफ ऑपरेशन सुरू करून, जिथे चॅम्फर संपतो त्या व्यासावर थांबवा.
3. सुरुवातीच्या व्यासाला पुन्हा या आणि चॅम्फर सुरुवातीच्या स्थानावर आहे, याची खात्री करा.
4. एका ब्लॉकमध्ये चॅम्फर कट करा आणि त्यानंतर येणाऱ्या ब्लॉकमध्ये पार्ट-ऑफ करा.
या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी पुढील प्रोग्रॅम उदाहरण पहा.
पार्ट-ऑफ टूल वापरून चॅम्फर प्रोग्रॅम 03703 (पार्ट-ऑफ चॅम्फर)
G20
...
N120 G50 S1250 T0800 M42
N121 G96 S350 M03
N122 G00 X 2.65 Z-2.015 T0808 M08
N123 G01 X2.2 F0.004
N124 X 2.46 F0.03
N126 U - 0.1 W - 0.05 F0.002
N127 X - 0.03 F0.004
N125 Z-1.95
N128 G00 X 2.65
N129 X 5.5 Z 2.0 T0800 M09
N130 M30
%

uy
वरील प्रोग्रॅममध्ये ब्लॉक N122 मध्ये X अक्षाच्या 2.0 या मूल्याच्या मागे 0.015 अंतरावर टूलचे स्थान घेतले आहे, तर ब्लॉक N123 काही काळापुरता ग्रूव्ह व्यास 2.200 वर बनवितो. पुढील ब्लॉक N124 ग्रूव्हच्या बाहेरील हालचाल (मोशन) करतो. ही हालचाल चॅम्फरच्या सुरुवातीच्या व्यासापर्यंत (2.460) होते. N125 मध्ये टूल चॅम्फरच्या सुरुवातीच्या स्थानापर्यंत Z अक्षामध्ये जाते.
N126 ने चॅम्फर यंत्रण (इन्क्रिमेंटल मोड) होते. जर अबसोल्युट मोड वापरला तर, N126 ब्लॉक पुढीलप्रमाणे होईल.
N126 X 2.36 Z - 2.0 F0.002
यामध्ये चांगला पृष्ठीय फिनिश येण्यासाठी सरकवेग (फीड) कमी केलेला आहे.
बारपासून यंत्रभाग स्वतंत्र झाल्यानंतर तो खाली पडतो. खाली पडल्यावर जर त्याला दणका बसला, तर तयार झालेल्या चांगल्या यंत्रभागाचे नुकसान होते. काहीवेळा तो निरुपयोगीदेखील होतो. हे नुकसान टाळण्यासाठी तयार झालेला यंत्रभाग शीतक असलेल्या बादलीत पाडला, तर नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी यंत्रभाग पडण्याच्या मार्गावर, सी.एन.सी. ऑपरेटर शीतक भरलेली बादली ठेऊ शकतो.
 
आवश्यक सूचना : प्रोग्रॅम चालू असताना आणि स्पिंडल फिरत असताना यंत्रभागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये.
Powered By Sangraha 9.0