कठिणीकरण सुधारणा

08 Apr 2018 11:47:45

Hardening correction
 
धातुकाम कल्पक सुधारणा स्पर्धेमध्ये आलेल्या प्रवेशिकांपैकी बक्षीसपात्र ठरलेली ही चिखलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद येथील एनआरबी कंपनीमधील गटाने केलेली सुधारणा
 
• उत्पादन-नीडल रोलर्स
• कायझन कार्यगटाचे नावः व्हिजन टेक
• कार्यक्षेत्र : उत्पादन ( हीट ट्रीटमेंट)
कार्यगटाचा नेता : सी. एम. हुमणे (व्यवस्थापक, मॅन्युफॅ क्चरिंग)
• सदस्य : श्रीकांत डब्ल्यू राजेन्द्र (उपव्यवस्थापक - क्यू ए)
• जय खोसे (प्रॉडक्शन इंजिनियर - हीट ट्रीटमेंट)
 
VisionTake
 
समस्या निवड 
गुणवत्ता
 
i) नीडलच्या कठीणतेमध्ये प्रचंड तफावत त्यामुळे कमी Cp/Cpk.
 
उत्पादन
 
i) टेम्परिंगचा आवर्तन काळ(सायकल टाईम) जास्त असल्याने उत्पादनास लागणारा एकंदर वेळ(थ्रू पुट टाईम) जास्त होता. त्यामुळे उत्पादन कमी.
 
समस्या निश्चित करणे
कायझन थीम (मुख्य विषय)...
 
टेम्परिंग प्रक्रियेत आणि तिच्या आवर्तन कालात सुधारणा करण्यासाठी बास्केट बदलणे .
 
समस्येची व्याख्या
 
टीआरआर वर्क ऑर्डर्समध्ये टेम्पर केलेल्या नीडल्सच्या कठीणतेच्या फरकातील पल्ला (रेंज) 3 HRC पर्यंत आहे, जो अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिक आहे.
 
Table2
 
कामाची यादी
प्रकल्पाचे नाव: टीआरआर मटेरियलच्या टेम्परिंगमध्ये सुधारणा.
 
उद्दिष्ट 
एअर टेम्परिंग केल्यानंतर एकसारख्या कठीणतेचे मटेरियल मिळवणे.
 
’का’प्रश्न विचारून केलेले विश्लेषण (व्हाय व्हाय अ‍ॅनालिसिस)
 
(समस्या सोडविण्याच्या या पद्धतीत कुठल्याही समस्येला आपण 5 वेळा ‘का’ हा प्रश्न विचारल्यास समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्यावरचा उपाय मिळतो असे मानले जाते)
 
टीआरआर वर्क ऑर्डर्समधील कठीणतेच्या फरकाचा पल्ला इतका अधिक का आहे?
 
1. का-टेम्परिंगच्या भट्टीमध्ये टेम्परिंगला आवश्यक तापमान मिळण्यात उशीर
का लागतो?
 
2. का - टेम्परिंग बास्केटचा व्यास जास्त आहे (610 मिमी).
 
3. का - कमकुवत डिझाईन
 
उपाय योजना
 
एकसारखे टेम्परिंग तापमान मिळावे यासाठी बास्केटचे डिझाईन नव्याने करणे आणि कमीत कमी आवर्तन काळात टेम्परिंग प्रक्रिया आणि कठीणतेतल्या फरकाचा पल्ला यांचे प्रमाणीकरण करणे.

Temparature 
 
कायझन कल्पना आणि उपाय योजना
उपाय योजना
 
का-का विश्लेषणावर आधारित टेम्परिंग बास्केटचे नव्याने डिझाईन केले आणि आवर्तन काळ आणि कठीणतेचा पल्ला कमी झाल्याचे प्रमाणित केले.
 
सुधारणा थीम
प्रत्यक्ष परिस्थिती
 
टीआरआर कठिणीकरणाच्या वर्क ऑर्डरचा टेम्परिंगनंतरचा कठिणतेच्या फरकाचा पल्ला 3 एचआरसीच्या आतमध्ये होता, तर याची टॉलरन्स पातळी 4 एचआरसी इतकी होती.
 
heat Transfer
Graph of difficulty range
 
 मूलभूत कारण
 
टेम्परिंग बास्केटच्या मोठ्या व्यासामुळे टेम्परिंगसाठी आवश्यक एकसारखे तापमान प्रस्थापित होण्यासाठी अधिक वेळ लागत होता.
 
Air Temparing-Hardness renge
 
फायदे
उत्पादाच्या कठीणतेतील फरकाच्या पल्ल्याची सातत्यपूर्ण आणि सुधारलेली पातळी, त्यासोबत खात्रीलायक प्रक्रिया नियंत्रण आणि कमी झालेला आवर्तन काल, या सर्वांमुळे उत्पादकता, गुणवत्ता यांच्यात वाढ होत असून ऊर्जेची बचतही होत आहे.
 
प्रकल्पाचा खर्च - नव्या डिझाईनची बास्केट
बनवण्याचा खर्च - रू. 4,300/-
 
पीक्यूसीडीएसएम मध्ये फायदे
 
पी - (प्रॉडक्शन) दरमहाचे उत्पादन 58% ने वाढले.
 
क्यू - (क्वॉलिटी) कठीणतेमधील फरक कमी झाला.(सीपी/सीपीके सुधारले)
 
सी - (कॉस्ट) एअर टेम्परिंगच्या खर्चात बचत रू 4,66,560 /- प्रति वर्ष ..(ए)
विजेची बचत = रू. 144 X 1.5 तास X 6 चार्जेस X 30 दिवस X 12 महिने = 4,66,560
ऑईल टेम्परिंगचा खर्च होण्याचे थांबले - रू 6,66,300 प्रति वर्ष .(बी)
तेलाची किंमत - 1500 लिटर्स X 185 रू. प्रति लिटर = 2,77,500 प्रति वर्ष
विजेची बचत = रू. 45 X 24 तास X 30 दिवस X 12 महिने = 3,88,800 प्रति वर्ष
खर्चात निव्वळ बचत =(ए)+(बी)= रू.11,32,860 प्रति वर्ष
 
डी - (डिलिव्हरी) एकंदर उत्पादनाला लागणाऱ्या वेळात 38% घट.
 
एम - (मॅनपॉवर) ऑपरेटरचा थकवा कमी झाला.
 
ईएचएस - (एन्व्हायरॉनमेंट) प्रदूषण, तेलाचा वापर, जमीन खराब होणे थांबले आणि ऑईल टेम्परिंग,धुलाईच्या कामात विजेचा वापर नाहीसा झाला.
 
वापरलेली टूल आणि तंत्रे
01. ब्रेनस्टॉर्मिंग
02. पी-डी-सी-ए चक्र
03. प्रवाह तक्ता
04. माहिती गोळा करणे आणि चाचणीची अंमलबजावणी
04.1. एसपीसी विश्लेषण
04.2. औष्णिक मॅपिंग
04.3. स्ट्रॅटिफिकेशन
04.4. बार आलेख
05. ’का’-विश्लेषण
06. माइलस्टोन चार्ट (महत्त्वपूर्ण टप्प्यांचा तक्ता)
 
madhavmukul@gmail.com
माधव कुलकर्णी हे यांत्रिकी अभियंते आहेत. ते सध्या एनआरबी बेअरिंग्ज औरंगाबाद येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
Powered By Sangraha 9.0