एंड मिल वापरून शोल्डर मिलिंग

02 May 2018 09:45:05


Insert Holder

 

कार्यवस्तूच्या बाजूंचे यंत्रण करण्याचे काम म्हणजे एंड मिलिंग. कार्यवस्तू जमिनीवर आडवी ठेवल्यास जो पृष्ठभाग जमिनीशी काटकोनात उभा असतो, त्याचे मिलिंग म्हणजे एंड मिलिंग अशीही व्याख्या करता येईल. एंड मिलिंग हे काम पुढे दिलेल्या दोन प्रकारे करता येते.


1. सॉलिड कार्बाईड एंड मिलचा वापर करून.

2. एंड मिल कटरच्या सोबत इंडेक्सेबल इन्सर्टचा वापर करून.


सामान्यतः सॉलिड कार्बाईड टूल फिनिशिंगसाठी वापरली जातात. त्यांचा उपयोग रफिंगच्या कामात करणे जिकिरीचे असते. कारण रफिंगच्या कामात एक किंवा त्याहून अधिक पासेसद्वारा भरपूर प्रमाणात धातू कापून काढला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाने रफिंगच्या कामासाठी एक विशिष्ट भूमिती असलेली टूल विकसित केली गेली आहेत. अशी टूल अधिक महाग असतात. मध्यम आणि लघु उद्योजकांना असे एंड मिल परवडत नाहीत आणि एकदा ते टूल वापरून शोल्डरचे मिलिंग केल्यानंतर त्याच्या कडांना पुन्हा ग्राइंड करून पहिल्यासारखी गुणवत्ता मिळवणे अवघड असते. त्यामुळे रफ कामांसाठी इंडेक्सेबल इन्सर्ट असलेल्या एंड मिल वापरणे अधिक हितावह असते.


Machine: VMC 3 axis 


इंडेक्सेबल टूलचे फायदे


1. एंड मिलिंग

2. स्लॉटिंग - खाच पाडणे (स्ट्रेट मिलिंग अथवा लिनिअर

रॅम्पिंग पद्धतीने)

3. बोअर मोठे करणे (हेलिकल रॅम्पिंग पद्धतीने)

4. प्लंजिंग

5. इंटरपोलेशनद्वारा स्पॉट फेसिंग

6. फेस मिलिंग


एंड मिलिंग/शोल्डर मिलिंग कामाचे उदाहरण

यंत्रभाग : सपोर्ट प्लेट (चित्र क्र. 1 मध्ये दाखविल्यानुसार)

मटेरियल : एस. जी.लोखंड

काम : स्लॉट मिलिंग आणि शोल्डर मिलिंग

सध्याच्या सॉलिड कार्बाईड टूलमधील समस्या

अ. टूल तुटत असे.

आ. आवर्तन काळ/कर्तनाला लागणारा वेळ जास्त होता, कारण पासेसची संख्या अधिक होती.

इ. जास्त अक्षीय खोलीवर यंत्रण करणे अवघड होते.

वरील काम करण्यासाठी सध्या वापरलेल्या टूलचा तपशील तक्ता क्र. 1 मध्ये दिला आहे.


Details of the old method of using indexable tools 


TOMX 10 टूलची वैशिष्ट्ये आणि फायदे


TOMX Insert Holder
Details of the new method of using indexable tools

 

इंडेक्सेबल इन्सर्ट प्रकारचे एंड मिल वापरल्यानंतर झालेले फायदे

1. आवर्तन काळ 50% ने कमी झाला, कारण पासेसची संख्या 16 वरून 8 वर आली

2. टूल तुटण्याची समस्या संपुष्टात आली.

3. टूलचे आयुर्मान दुप्पट झाले.

4. अन्य प्रकारच्या धातूंवर उदाहरणार्थ, ॲलॉय स्टील, स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न वगैरे हे टूल वापरणे शक्य आहे.

 

purohit@duracarb-india.com

विजेंद्र पुरोहित यांना मशिन टूल, कटिंग टूल डिझाईनमधील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून सध्या ते ’ड्युराकार्ब इंडिया’ कंपनीमध्ये तांत्रिक साहाय्य विभागाचे प्रमुख आहेत.

Powered By Sangraha 9.0