वर्कशॉपमध्ये यंत्रण करत असताना ज्यावेळी तेच काम (ऑपरेशन) पुन्हा पुन्हा करावे लागते, अशावेळी त्या ठिकाणी योग्य तो प्रोग्रॅम तर लागतोच, त्याचबरोबर एकूण प्रोग्रॅमची लांबी आणि गुंताही वाढतो. यामध्ये जाणारा वेळ, मेहनत कमी करण्यासाठी पुनरावृत्ती (रिपिटेटीव्ह) आवर्तनाचा वापर केला जातो. सी.एन.सी. कंट्रोलमध्ये असणारे हे आवर्तन अत्यंत लोकप्रिय झाले आहे. तसेच त्यांच्या वापरामुळे वाचणारा वेळ, कामातील अचूकता आणि कमी खर्च हे परवलीचे मुद्दे बनले आहेत.
सर्वसाधारण माहिती
यामध्ये G या अक्षराखाली 7 पुनरावृत्ती आवर्तने उपलब्ध आहेत. प्रत्येक पुनरावृत्ती आवर्तन G कोड आणि त्यापुढे आकडा अशा पद्धतीने दर्शविल्या जातात.
प्रोफाईल कटिंग आवर्तन - रफिंग
G71- रफ कटिंग आवर्तन - हॉरिझाँटल भागासाठी.
G72- रफ कटिंग आवर्तन-मल्टिपल भागासाठी.
G73- पॅटर्न रिपिटिंग रफिंग आवर्तन.
प्रोफाईल कटिंग आवर्तन - फिनिशिंग
G70- G71, G72, G73 साठी फिनिशिंग आवर्तन.
चिप ब्रेकिंग आवर्तन
G74- ड्रिलिंग आवर्तन - Z अक्ष हॉरिझाँटल
G75- ग्रुव्हिंग आवर्तन - X अक्ष व्हर्टिकल
थ्रेडिंग आवर्तन
G76 -थ्रेडिंग आवर्तन सरळ किंवा निमुळते (टेपर) हे आपण मागील लेखात पाहिले आहे.
या भागामध्ये आपण G73 पॅटर्न रिपिटिंग रफिंग आवर्तन विस्ताराने पाहणार आहोत.
कंटूर पॅरलल रफिंग आवर्तन - G73 आणि त्याच कार्यवस्तूवर फिनिश, टर्निंग, कटर रेडियस कॉम्पेन्सेशनसह (चित्र क्र.1)
बहुतेकवेळा कारखान्यामध्ये कंटूर (गोलाकार पृष्ठभाग) करावा लागतो. अशावेळी आहे त्या कंटूरला समांतर रफ काप काढून त्यानंतर फिनिश टर्निंग करणे उपयुक्त ठरते. फिनिश टर्निंग करत असताना कटर रेडियस कॉम्पेन्सेशन चालू करून घेतल्यास अचूकता वाढते.
यासाठी चित्र. क्र.1 मधील उदाहरण पाहता येईल. या कार्यवस्तूसाठी दोन टूल वापरावी लागतील.
1) T7- रफिंग- फीड 0.3 मिमी./रिव्होल्युशन टूल नं.7, कटिंगची खोली 2 मिमी.
2) T8 - फिनिश टर्निंग - फीड 0.15 मिमी/रिव्होल्युशन टूल नं.8
कंटूर पॅरलल रफिंग प्रोग्रॅम (सिमेन्स)
G96 V130 T707 M4
G0 X150 Z2 M8
G73 P90 Q100 I0.5 U-7 W-5 D2 F0.3
G26 M9
फिनिश टर्निंग
G96 V130 T808 M4
G46
G0 X 35 Z1 M8
G01 A90 F0.5
G01 X46 Z-25 A-12 F0.15
G01 A180 R15 E0.1
G01 X88 Z-55 A-65
G01 A170 R15
G01 X150 Z-98 A-75
G01 X152 Z-99
G40
G26 M9
अनेकदा कारखान्यामध्ये काम करत असताना काही कार्यवस्तू अशा येतात की, ज्यांच्या फिनिश झालेल्या कंटूरचा आकार (गोलाकार भाग) कार्यवस्तूच्या मूळ आकाराशी मिळता जुळता असतो. अशा कार्यवस्तूचे मशिनिंग G73 आवर्तन वापरून सहज करता येते. या आवर्तनाचा वापर करून कंटूर रफिंग आवर्तन कमी वेळात व चार ते पाच ओळींचा प्रोग्रॅम वापरून करता येते.
कंटूर पॅरलल रफिंग आवर्तन - G73 कमांड फॉरमॅट (सिमेन्स)
G73- A..P..Q..U..W..I..K..D..F..E..S
A..P..Q - फिनिश कंटूरचे वर्णन
A- सबरूटीनमध्ये नोंदलेले फिनिश कंटूर
P...Q- ब्लॉक नंबर्समध्ये नोंदलेले फिनिश कंटूर
U...W--X आणि Z वरील अलाऊंस
I/K--X आणि Z अक्षावरील मशिनिंग अलाऊंस
D- कापाची खोली (डेप्थ ऑफ कट)
F- फीड रेट
E -फीड रेट डिसेंडिंग कंटूर
S - स्पिंडलचा वेग
गोलाकार भाग दोन पद्धतीने दाखवला जातो.
1. उतरत येणारा गोलाकार भाग
2. चढत जाणारा गोलाकार भाग
उतरत जाणाऱ्या गोलाकार भागाचे यंत्रण करताना फीड रेट कमी करावा लागतो. हा फीड रेट प्रोग्रॅममध्ये ’E’ या अक्षराचा वापर करून अपेक्षित किंमत (व्हॅल्यु) देऊन कमी करता येतो. ’E’ ला कोणतेही इनपुट न दिल्यास कंट्रोल आपोआप ’F’ या अक्षराबरोबर दिलेला फीड रेट घेतो. (चित्र क्र. 2)
U आणि W या अक्षरांनी रफ पार्ट अलाऊंस दाखवला जातो. म्हणजेच रफ, फिनिश भागामधील फरक U आणि W नी दर्शविला जातो. त्यामुळे या दोन्ही अक्षरांना दिशा,धन किंवा ऋण चिन्ह येते. (चित्र क्र.3)
फिनिशिंग कापासाठीचा अलाऊंस I किंवा K या अक्षरांनी दर्शविला जातो. I ने कटिंगची X अक्षामधील खोली दर्शविली जाते, तर K ने Z अक्षामधील खोली दर्शविली जाते.
महत्त्वाची सूचना - G73 आवर्तन सुरू करण्याआधी टूल ऑक्झिलरी पॉईंटवर थांबवणे बंधनकारक आहे. हा पॉईंट व टूलची धडक बसण्यापासून मुक्त (कोलिजन फ्री) असावा.
G73 ला पॅटर्न पुनरावृत्ती आवर्तन, क्लोजड् लूप किंवा प्रोफाईल कॉपिंग आवर्तन असेही म्हणतात. याचा मुख्य उपयोग वेड्यावाकड्या आकाराच्या कार्यवस्तूचे रफिंग करण्याचा वेळ कमी करणे हा आहे. (उदाहरणार्थ, फोर्जिंग किंवा कास्टिंग्ज.)
G73- आवर्तन फारमॅट फानुक -10T/11T/15T
G73- P...Q...I...K...U...W...D...F...S
P- फिनिशिंग प्रोफाईलमधील पहिला ब्लॉक नंबर
Q- फिनिशिंग प्रोफाईलमधील शेवटचा ब्लॉक नंबर
I- X अक्षावरील अंतर रिलिफची दिशा
K- Z अक्षावरील अंतर रिलिफची दिशा
U- X अक्षावर ठेवलेला स्टॉक
W- Z अक्षावर ठेवलेला स्टॉक
D- कटिंग डिव्हिजनचा आकडा
F- कटिंग फीडरेट
S- स्पिंडलचा वेग
G73-आवर्तन फारमॅट फानुक -0T/16T/18T/20T/25T
या प्रकारच्या मॉडेलमध्ये डबल ब्लॉक प्रवेश लागतो.
पहिला ब्लॉक
G73- U...W...R
U- X अक्ष अंतर रिलिफ
W- Z अक्ष अंतर आणि रिलिफची दिशा
R- कटिंग डिव्हिजनची संख्या
दुसरा ब्लॉक
G73- P...Q...U...W...F...S
P- फिनिशिंग प्रोफाईलचा पहिला ब्लॉक
Q- फिनिशिंग प्रोफाईलचा शेवटचा ब्लॉक
U- X अक्षावर ठेवलेला स्टॉक
W- Z अक्षावर ठेवलेला स्टॉक
F- कटिंग फीड रेट - P आणि Q- ब्लॉकमध्ये ओव्हरराईड
S- स्पिंडलचा वेग -P आणि Q- ब्लॉकमध्ये ओव्हरराईड
उदाहरण-फानुक 0T/16T/18T/20T/25T
पहिला ब्लॉक
N10 G50 S200 T0400
G96 S200 M03
G00 X 35.0 Z5.0 T0404 Z0
G01 X -1.6 F0.2
G00 X 70.0 Z10.0
G73 U3.0 W2.0 R2
G73 P12 Q16 U0.5 W0.1 F0.25
N12 G00 G42 X20.0 Z2.0
G01 Z-10.0 F0.15
G02 X 40.0 Z-20.0 R10.0
G01 Z-30.0
X60.0 Z-50.0
N16 G40 U1.0
G70 P12 Q16
G00 X 200.0 Z200.0 T0400
M30
G70 कंटूर फिनिशिंग आवर्तन
रफिंगनंतर फिनिशिंगसाठी G70 आवर्तन वापरले जाते. याचा उपयोग केवळ फिनिशिंगसाठीच केला जातो.
G70-आवर्तन फॉरमॅट (सर्व प्रकारच्या कंट्रोलसाठी समान)
G70 - P...Q...F...S
P-फिनिशिंग प्रोफाईलचा सुरूवातीचा ब्लॉक नंबर
Q-फिनिशिंग प्रोफाईलचा शेवटचा ब्लॉक नंबर
F - कटिंग फीडरेट (इंच/फेरा, मिमी/ फेरा)
S - स्पिंडलचा वेग (F+/मिनिट, मि/मिनिट)
रफिंग आवर्तनासाठी वापरलेला सुरुवातीचा पॉईंटच G70 साठी वापरावा.
उदाहरणार्थ, पॅटर्न पुनरावृत्ती (03509)
03509 (G73 पॅटर्न पुनरावृत्ती आवर्तन) (चित्र क्र. 5)
N1 G20 M42
N2 T0100
N3 G96 S350 M03
N4 G00 G42 X3.0 Z0.1 T0101 M08
N5 G73 P6 Q13 I0.2 K0.3 U0.06 W0.004 D3 F0.01
N6 G00 X0.35
N7 G01 X1.05 Z-0.25
N8 Z-0.625
N9 X1.55 Z-1.0
N10 Z-1.625 R0.25
N11 X2.45
N12 X2.75 Z-1.95
N13 U 0.2 F0.02
N14 G70 P6 Q13 F0.006
N15 G00 G40 X 5.0 Z2.0 T01
N16 M30
चित्र क्र. 5 मधील ड्रॉईंगमध्ये X आणि Z अक्षामध्ये एकसारखे मटेरियल काढणे शक्य नाही, कारण कार्यवस्तू वेडीवाकडी आहे. अशाच तऱ्हेच्या अनेक कार्यवस्तू फोर्जिंग आणि कास्टिंगमध्ये तयार होत असतात.
अशावेळी जास्तीत-जास्त किती मटेरियल प्रत्येक बाजूवरून काढता येईल ते ठरवावे लागते. वरील उदाहरणात 0.200 मिमी एवढे मटेरियल बाजूवरून तर 0.100 मिमी एवढे मटेरियल फेसवरून काढता येईल. म्हणून वरील उदाहरणामध्ये I ची किंमत 0.200 तर K ची किंमत 0.300 व D ची किंमत 3 आहे.
वरील प्रोग्रॅममध्ये रफिंग आणि फिनिशिंग एकाच टूलने केले आहे.
G70- G73 आवर्तन वापरण्यासाठी मूलभूत नियम
1) मटेरियल काढण्यासाठीचे आवर्तन सुरू करण्याआधी टूल नोज रेडियस ऑफसेट लागू करा.
2) मटेरियल काढण्यासाठीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर टूल नोज रेडियस ऑफसेट बंद करा.
3) सुरुवातीचा पॉईंटला परत जाण्याची गती स्वयंचलित असते. त्यासाठी वेगळ्या प्रोग्रॅमची गरज नसते.
4) G75 च्या P ब्लॉकमध्ये Z अक्षाची किंमत घालू नये.
5) U-स्टॉक अलाऊंस हा व्यासावर प्रोग्रॅम केलेला असतो. त्याच्या चिन्हावरून कोणत्या बाजूचा स्टॉक लागू करायचा आहे, ते कळते.
6) फिनिशिंग कंटूरसाठी केलेला फीड रेट प्रो रफिंगच्यावेळी नाकारला जातो.
7) D ॲड्रेस डेसिमल पॉईंट वापरत नाही आणि प्रोग्रॅम करत असताना पुढे किंवा मागे शून्य लावावे लागते. उदाहरणार्थ - D0-750 किंवा D750 = 0.0750
sheetalcomp@yahoo.com
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.