गेल्या दशकात, क्लाउड संगणन (कॉम्प्युटिंग), प्रचंड प्रमाणातील माहिती (डाटा) आणि मोबाइल संगणन यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मजबूत आधारस्तंभांचे विकसन झाले आहे. यामुळे इंडस्ट्री 4.0 चळवळीला हातभार लागला आहे आणि त्यामुळेच स्मार्ट फॅक्टरी हे स्वप्न साकार होऊ लागले आहे. इंडस्ट्री 4.0 ही संज्ञा भविष्यातील कारखाने आणि त्यांच्यातील स्वयंचलन, माहिती संकलन आणि कनेक्टिव्हिटीवर भर देणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यातील कल यांच्यासाठी वापरण्यात येते. इंडस्ट्री 4.0 हा औद्योगिक क्रांतीमधील एक नवीन टप्पा आहे, जो इंटरकनेक्टिव्हिटी, स्वयंचलन, मशीन लर्निंग आणि रिअल टाइम डाटा यांच्याबरोबर सखोल विश्लेषण आणि नजीकच्या भविष्याचे पूर्वानुमान यांच्यावर केंद्रित असेल. इंडस्ट्री 4.0 म्हणजे सर्व बाबींमधील नेटवर्किंग. एका स्तरावर व्यवस्थेच्या (सिस्टिम) अनेक घटकांमधील नेटवर्किंग आणि दुसऱ्या स्तरावर मशीन आणि मूल्य शृंखलेमधील (व्हॅल्यू चेन) जबाबदार व्यक्ती यांच्यामधील नेटवर्किंग.
आज कार्यरत असलेली प्रत्येक कंपनी आणि संस्था भिन्न भिन्न असल्या तरी या सर्वांसमोर एक समान आव्हान आहे. एकत्र जोडलेले असण्याची आवश्यकता आणि प्रक्रिया, भागीदार, उत्पादने आणि लोक यांच्याविषयी प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती (रिअल टाइम अॅक्सेस). याच क्षेत्रात ज्योती सी.एन.सी.ने नवीन इंडस्ट्री 4.0 उपाययोजना (सोल्यूशन) आणली असून जिचे नाव '7th सेन्स' असे आहे. उत्पादन, आरोग्य आणि पूर्वानुमानी (प्रेडिक्टिव्ह) देखभाल यांच्यासाठी प्लांट आणि मशीनबरोबर लाइव्ह संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये दिलेली आहे. मोठ्या संख्येने अत्याधुनिक संवेदक (सेन्सर), अतिशय सोयीस्कर कॉकपिट आणि लाइव्ह संनियंत्रण (मॉनिटरिंग) पद्धत, धोक्याच्या सूचना, कल अहवाल (ट्रेंड रिपोर्ट) आणि पूर्वानुमानी विश्लेषण यांच्या साहाय्याने ही उपाययोजना प्रत्यक्षात आली आहे. हे सर्व ज्योती सी.एन.सी.मधील अभियंत्यांनीच बनविलेले आहे.

7th सेन्स हे इंडस्ट्री 4.0 चे धातुकामाच्या क्षेत्रात अस्सल मूल्यवर्धित सेवा देणारे एक क्रांतिकारक टूल आहे. या टूलचे लक्ष्य प्रामुख्याने मशीन संनियंत्रण, विश्लेषण-मूल्यांकन-नियंत्रण, सेवा आणि देखभाल, ऑपरेशन आणि नियोजन यांच्यावर केंद्रित आहे.
प्रणालीची माहिती
7th सेन्स हे सी.एन.सी. स्वयंचलन आणि उत्पादन क्षेत्रामधील नेक्स्ट जनरेशन इंडस्ट्री 4.0 टूल आहे. पारंपरिक पी.पी.सी. (प्रॉडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल) मॉडेलची नवीन व्याख्या ही प्लॅन, प्रोड्यूस आणि कम्प्लीट अशी आहे. 7th सेन्स या नव्या कार्यपद्धतीला पूर्ण स्वातंत्र्य देते. 7th सेन्स अतिशय लवचिकपणे, परिस्थितीनुसार हे बदल करू शकते आणि तत्संबंधी अधिसूचना देते. यातून मिळणाऱ्या तर्कशुद्ध अहवालांद्वारे एकंदर कार्यक्षमता ठरविता येते. 7th सेन्सच्या साहाय्याने भारतामध्ये घडू पाहणाऱ्या या क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी ज्योती सी.एन.सी. कटिबद्ध आहे. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग हेच भविष्य आहे आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या पावलावर पाऊल टाकणे अतिशय आवश्यक आहे.

7th सेन्स हे एक उच्च स्वयंचलन असलेले आणि या उद्योगक्षेत्रातील अत्याधुनिक ऑपरेशनमधील प्रक्रिया करण्यास सक्षम उपकरण आहे. हे नित्यक्रमातील आणि पुन्हा पुन्हा करावयाची कामे सक्षमपणे करू शकते, ज्यामुळे त्या जागी काम करणाऱ्यांना त्या कामांच्या अंतिम परिणामांवर लक्ष देण्यासाठी संधी मिळते. याला जोडलेली उपकरणे प्रचंड माहिती तयार करतात, जी ऑपरेटर हाताळू शकत नाही, परंतु 7th सेन्स याचे रूपांतर उपयुक्त माहितीमध्ये करून सजग (इन्फॉर्म्ड) निर्णय घेण्यास मदत करते. 7th सेन्सचा वापर केल्याने मशीन टूल सेगमेंटमधील पुढील गोष्टींमध्ये बदल घडतील. प्रतिबंधात्मक देखभाल, सुधारित उपयोगिता, ऊर्जा बचत, अयोग्य वापर टाळणे, गुणवत्तेची वाढती हमी, मानवी भूमिकेत बदल इत्यादी.
उत्पादकता, आरोग्य, रिअल टाइम संनियंत्रण आणि टूल आयुर्मानाचे व्यवस्थापन यांना जोडणारी वैशिष्ट्ये असलेल्या व्हर्च्युअल मशीन स्क्रीनवर प्रक्रियेची अद्ययावत स्थिती दर्शविली जाते. त्रुटी कमी करण्यासाठी बुद्धिमान नेव्हिगेशन तसेच प्रक्रिया आणि निकालांचे स्मार्ट विश्लेषण देणारे विविध स्मार्ट अहवाल यांच्यामुळे मनुष्यांद्वारे अर्थबोधन (इंटरप्रिटेशन) करून निर्णय घेण्यासाठी फारसे काही बाकी रहात नाही.
कॉकपिट (डॅशबोर्ड)
कॉकपिटच्या साहाय्याने चालू कार्ये, कोणता टप्पा पूर्ण झाला आहे आणि अन्य माहिती इत्यादीचे त्वरित विहंगावलोकन करता येते. त्यामुळे मशीनची कार्यक्षमता आणि उत्पादकता मोजण्यात मानवी वेळ कमी खर्च होतो.
सुधारित सुरक्षा
कामगारांसाठी इंडस्ट्री 4.0 चा एक फायदा म्हणजे सुधारित सुरक्षा. या तंत्रज्ञानामुळे कामगारांना मशीनपासून अधिक दूर राहून काम करता येते आणि जेव्हा त्यांना जवळून काम करावे लागते, तेव्हा मानवी चुकीचा धोका जास्त असतो. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्वयंचलन आणि इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान, माहिती आणि सवय नसल्यामुळे सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते, परंतु या स्पर्धेच्या युगात मागे पडण्यापेक्षा, त्याचा शक्य तितक्या लवकर अंगिकार करणेच योग्य आहे.
⦁
लाइव्ह उत्पादन अपडेट
एका क्लिकद्वारा एकाच स्क्रीनवर सेटअपचा वेळ, उत्पादनाचा वेळ, थांबण्याचा वेळ (होल्ड टाइम), निष्क्रिय वेळ (आयडल टाइम), अनुत्पादक वेळ (डाऊन टाइम) आणि उत्पादित यंत्रभागांची संख्या यासारखे तपशील उपलब्ध होत असल्याने मशीनचे संनियंत्रण करण्यास साहाय्य मिळते. या स्क्रीनवर आपल्याला त्या विशिष्ट मशीनच्या उत्पादनाचे पूर्ण चित्र दिसते आणि त्यानुसार आपण आधीपासूनच काही कामे, कारवाया नियोजित आणि नियंत्रित करू शकतो.
2. लाइव्ह मशीन / प्लांट OEE
आपण आदर्श उत्पादनाच्या किती जवळ आहोत त्याचे एकंदर उपकरण परिणामकारकता (ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस, OEE) हे माप असते. जर केवळ चांगले (स्वीकृतीयोग्य) भाग, शक्य तितक्या अधिक वेगाने, मशीन न थांबता निर्माण केले, तर मिळणारी उत्पादनक्षमता म्हणजे OEE होय. OEE हा उत्पादनक्षमता मोजण्याचा मापदंड आहे. केवळ OEE स्कोअर हा आकडा उत्पादन सुधारण्यास तितकासा उपयुक्त नसतो, तर मशीन उपलब्ध नसल्याने, कमी कामगिरीमुळे आणि निकृष्ट गुणवत्तेमुळे होणारे मूलभूत तोटे समजून घेणे हे खरे OEE चे मूल्य आहे. ज्यात प्रत्यक्षात उत्पादन होते, फक्त त्याच वेळेची टक्केवारी 7th सेन्स पाहते. 100% OEE स्कोअरचा अर्थ असा की, आपण केवळ चांगलेच भाग, जास्तीतजास्त वेगाने, मशीन न थांबता निर्माण करीत आहोत. यातून आपली एकंदर कार्यक्षमता मोजली जाते.
3. लाइव्ह अनुत्पादक वेळ, कारणे आणि विश्लेषण
अनुत्पादक वेळ हा उत्पादनक्षमतेवर परिणाम करणारा एक मुख्य घटक आहे. 7th सेन्स आपल्या प्रत्येक मशीनच्या अनुत्पादक वेळेचे चित्र आपल्यासमोर उभे करण्याचे स्वातंत्र्य देते. तसेच ते विशिष्ट मशीनसाठी अनुत्पादक वेळेचे संभाव्य कारण ओळखण्यासदेखील मदत करते. ते मशीन, उत्पादनासाठी उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यास आणि कारवाई करण्यास मदत करते, ज्यामुळे नुकसान कमी होते. हे अनुत्पादक वेळेचा आलेख तयार करू शकते, ज्याच्यामुळे त्वरित विश्लेषण करणे बरेच सोपे होते.
इतर वैशिष्ट्ये
4. रिअल टाइम मशीन उपयोग
5. ड्रॉइंग आणि डाटा बेस एका टॅपमध्ये पाहता येतो.
6. ऑपरेटरची दैनंदिन कामे
7. सानुकूलित स्क्रीन, ट्रेंड चार्ट आणि विश्लेषणाची उपलब्धता
8. लवचीक वापरकर्तास्तरीय कॉन्फिगरेशन आणि बरेच काही
उदाहरण
हर्ष इंजिनिअर्स या कंपनीचा पाया तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्यांनी पहिल्यापासूनच संशोधन आणि विकासावर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे ते त्यांच्या ग्राहकांच्या गरजेनुसार अनुकूल उत्पादने विकसित करू शकतात. नवीन युगातील तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादनाची उत्कृष्टता मिळविणे हे हर्ष इंजिनिअर्सचे ब्रीद आहे. त्यांच्याकडे बेअरिंग केज आणि स्टॅम्प केलेले यंत्रभाग यांचे डिझाइन आणि निर्मिती होते. किंमत, गुणवत्ता आणि वस्तूनिर्मितीमधील लवचिकता यांच्यावर लक्ष केंद्रित करीत असताना ते चांगल्या उत्पादन पद्धतींचे आणि उद्योगाद्वारे स्वीकारलेल्या मानकांचे पालन करतात.
त्यांची टूल रूम अत्याधुनिक आणि अत्यंत अचूक सी.एन.सी. मशीनसह सुसज्ज आहे आणि आता त्यांना असे सांगण्यास अभिमान वाटतो की, "ज्योती सी.एन.सी.ने देऊ केलेल्या 7th सेन्सच्या माध्यमातून आम्ही इंडस्ट्री 4.0 ची पूर्तता करण्यासाठी आमच्या संसाधनांची श्रेणी सुधारित केली आहे. 7th सेन्स प्रणाली, उद्योगातील मानक वैशिष्ट्यांसह बनविलेली आहे आणि टेलर-मेड कस्टमायझेशनच्या अष्टपैलुत्वासह इंडस्ट्री 4.0 च्या मागण्या पूर्ण करण्यास सक्षम आहे. आम्ही हर्ष इंजिनिअर्समध्ये 7th सेन्स कार्यान्वित करण्यात यशस्वी झालो आहोत आणि त्याचे परिणाम आमच्यासाठी आनंददायी आहेत.
आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो की, जे.पी.एम.द्वारा (जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मेंटेनन्स) टी.पी.एम. कन्सिस्टन्सी पुरस्कार आम्हाला देण्यात आला आहे. टी.पी.एम. म्हणजे उपकरणे आणि कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविणे, नुकसान आणि कचरा दूर करणे."
टूल आयुर्मान व्यवस्थापन
⦁ टूल आयुर्मान आणि लोड संनियंत्रण
⦁ टूल व्यवस्थापन
⦁ टूल आयुर्मान आणि लोड संनियंत्रणासाठी कस्टमाइज्ड् तक्त्यासह वापरकर्ता व्यवस्थापन
⦁ सिस्टर टूल लायब्ररी मॅनेजमेंट आणि '7' टूल द्वारा आयुर्मान व्यवस्थापनासह लिंकेज आणि एन.सी. टूल व्यवस्थापनासह घनिष्ठ कॅस्केडिंग
⦁ वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक मशीनसह टूल व्यवस्थापन
⦁ टूल मॅनेजर : टूल स्टोअर वापरकर्त्याद्वारे कारखान्यातील टूलची अधिक चांगली अॅक्सेसिबिलिटी
''आम्ही आमच्या मशीन शॉपमध्ये 7th सेन्स वापरण्यास सुरुवात केल्यामुळे आम्हाला डेस्क न सोडता मशीनचे व्हर्च्युअली निरीक्षण करता येऊ लागले. त्याबरोबरच 7th सेन्सकडून स्वयंचलित माहिती जसे की, मशीनचा वापर, मशीनची उपलब्धता, खर्चाचे विश्लेषण, प्रति तासाची उत्पादन क्षमता या बाबी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करता येतात. ज्यामुळे या कामासाठी लागणारा अधिकचा वेळ आणि संसाधनांची बचत होण्यास मदत झाली आहे. 7th सेन्समुळे आम्ही रिअल टाइम मशीन स्थितीचे निरीक्षण करण्यास सक्षम झालो आहोत. डाउनटाइम तसेच तत्पर निर्णय घेण्यास आणि वेळापत्रक बनविण्यासाठीही 7th सेन्सची मदत होऊ लागली आहे. 7th सेन्सच्या मदतीने रिअल टाइम इंटिग्रेटेड OEE आणि रिअल टाइम कार्यक्षमतादेखील वापरकर्त्याला उपलब्ध
होत राहाते.''