मशीन टूल, वाहने, स्वयंचलन (ऑटोमेशन), विमान उद्योग (एव्हिएशन) या क्षेत्रांतील कोणत्याही यंत्रणेसाठी गिअर हा महत्त्वाचा घटक असतो. गिअर निर्मितीमध्ये हॉबिंग ही महत्त्वाची आणि प्राथमिक प्रक्रिया असते.
गिअर गुणवत्तेवर परिणाम करणारे तीन प्रमुख घटक
1. मशीन
2. कार्यवस्तू पकडसाधने (वर्क होल्डिंग डिव्हाइस)
3. कटिंग टूल – हॉब
या तीनही घटकांची योग्य निवड केल्यास आपल्याला हॉबिंग प्रक्रियेमधून अपेक्षित असलेली उत्कृष्ट गुणवत्ता मिळविता येते. परंतु त्याचबरोबर या तिन्ही घटकांच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण करणेदेखील तितकेच आवश्यक असते. या लेखात, आपण गिअर हॉबिंगमध्ये वारंवार निदर्शनास येणारे दोष आणि त्यांच्यावरील उपाय यांबद्दल चर्चा करणार आहोत.
गिअर निर्मितीची गुणवत्ता ठरविणारे घटक
⦁ मटेरियल
⦁ उष्णतोपचार (हीट ट्रीटमेंट)
⦁ गिअरची परिमाणे (डायमेन्शन)
⦁ गिअरच्या दातांची सूक्ष्म भूमिती (मायक्रोजॉमेट्री)
गिअरचे कार्य आणि टिकाऊपणा यांच्याबाबतीत गिअरच्या दातांची सूक्ष्म भूमिती खूप महत्त्वाची भूमिका बजावते, हे आम्ही आमच्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतो. सूक्ष्म भूमिती म्हणजे प्रोफाइल, लीड, पिच आणि रनआउट. या लेखात आपण गिअरच्या दातांच्या सूक्ष्म भूमितीमधील त्रुटी आणि उपाययोजनांवरील तपशीलवार विश्लेषण पाहणार आहोत.
सूक्ष्म भूमितीमधील सर्वसाधारणपणे निदर्शनास येणारे दोष तक्ता क्र. 1 मध्ये दाखविले आहेत.
फ्ल्यूट रेक कोनातील त्रुटी
हॉबचे रीशार्पर्निंग योग्य झाले असल्यावर, फ्ल्यूटचा रेक कोन शून्य असणे हे आदर्श आहे. तथापि ग्राइंडिंग व्हील आणि हॉब फ्ल्यूटचा अक्ष यांच्यातील चुकीच्या संरेखनामुळे +ve रेक कोन तयार होतो आणि यामुळे यंत्रभागाच्या अग्रावर (टिप) अतिरिक्त मटेरियल राहून एक अनिष्ट (अनडिझायरेबल) प्रोफाइल त्रुटी निर्माण होते.
प्रत्येक दोषाचे मूलभूत कारण आणि सुधारात्मक कृती तक्ता क्र. 2, 3 आणि 4 मध्ये दिली आहे.
उदाहरण
समस्या : सिंगल पिच एरर (fpmax) आणि रेडियल रनआउट (Fr)
मूलभूत कारण : यंत्रभागातील दातांच्या संख्येला हॉबमधल्या स्टार्टच्या संख्येने पूर्ण भाग जातो हे सिंगल पिच त्रुटीचे कारण असते आणि फिक्श्चरचा रनआउट जास्त म्हणजेच 10 मायक्रॉनपेक्षा जास्त असणे हे अरीय रनआउटचे कारण असते.
सुधारणा : हॉबमधील स्टार्टच्या संख्येची निवड अशी करावी, की तिला यंत्रभागामधील दातांच्या संख्येने (सिंगल स्टार्ट वगळता) पूर्ण भाग जाणार नाही आणि फिक्श्चरचा रनआउट 3 मायक्रॉनच्या आत नियंत्रित केला पाहिजे.
परिणाम : हॉबमधील स्टार्टच्या संख्येची योग्य निवड करून सिंगल पिच त्रुटी नियंत्रित केली आणि फिक्श्चर रनआउट 3 मायक्रॉनच्या आत राखून अरीय (रेडियल) रनआउट नियंत्रित केला गेला.
तक्ता क्र. 5
निष्कर्ष : तक्ता क्र. 5 मध्ये दिलेल्या 'C1' या अहवालात सुधारात्मक कृती केल्यानंतरची सिंगल पिच त्रुटी (fpmax) आणि अरीय रनआउट (Fr) दाखविले आहेत. सिंगल पिच त्रुटी आणि अरीय रनआउट दोन्ही सुधारले आहेत असे 'C2' अहवालावरून आपल्या लक्षात येते.
गिअरचे उत्पादन करताना सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यासाठी, गिअर हॉबिंग प्रक्रियेमध्ये पुढील कार्यपद्धती वापरण्याची शिफारस केली जाते.
1. बोअर टॉलरन्स आणि फेसच्या स्क्वेअरनेसशी संबंधित गिअर ब्लँक्सची गुणवत्ता नियंत्रित करणे.
2. पुढील गोष्टींसाठी तपासणी तक्ता तयार करणे.
· फिक्श्चर, हॉब माउंटिंग आणि उत्पादनाच्या पहिल्या यंत्रभागाच्या मंजूरीसाठी सेटअप प्रक्रिया करणे.
· यंत्रभागांची आणि हॉबची नियमित कालावधीने तपासणी करणे.
· हॉबचे आयुर्मान निश्चित करणे आणि नंतर त्याचे संनियंत्रण करणे.
· नियमित कालावधीनंतर फिक्श्चरचे कॅलिब्रेशन करणे.
· नियमित कालावधीनंतर तपासणी उपकरणांचे कॅलिब्रेशन करणे.
· मशीनची नियमित कालावधीने देखभाल करणे.
· गुणवत्ता परीक्षण (व्हिज्युअल तपासणीसह) करण्यासाठी ऑपरेटरचे प्रशिक्षण गरजेचे आहे.
प्रकाश कदम
व्यवस्थापकीय संचालक, प्रगति ट्रान्स्मिशन प्रा. लि.
9341215974
kadam@pragatigears.com
प्रकाश कदम, यांत्रिकी अभियंते असून प्रगति ट्रान्स्मिशन प्रा. लि. कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना गिअर निर्मिती क्षेत्रातील कामाचा सुमारे 25 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.