बोरिंगमध्ये भोकाच्या आतील व्यासावरील मटेरियल काढले जाते. यामध्ये भोकाची खोली वाढविण्याच्या दृष्टीने कोणतेही काम केले जात नाही.
बोरिंगमध्ये वापरला जाणारा बोरिंग बार हा धातूचा बार असून त्याच्या टोकाला टूल लावलेले असते. जेव्हा दंडगोलाकार भागावर बोरिंग केले जाते तेव्हा ती प्रक्रिया लाइन बोरिंग म्हणून संबोधली जाते. दुसऱ्या प्रकारचे बोरिंग, बॅक बोरिंग म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये भोकाचे मागील बाजूने यंत्रण करून आकार वाढविला जातो. बोरिंगचे काम मिलिंग मशिनवर त्याचबरोबर लेथ मशिनवर करता येते.
जेव्हा कार्यवस्तूमध्ये केवळ बोरिंगचे काम असते तेव्हा त्यात किचकटपणा असण्याची शक्यता फार कमी असते, परंतु बोरिंगबरोबर बाह्य व्यासाचे टर्निंग, काउंटरिंग, ड्रिलिंग आदी कामे असल्यास गुंता वाढतो. उदाहरणार्थ, चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेल्या कार्यवस्तूमध्ये बोरिंगसह बाह्य टर्निंग, ड्रिलिंग अशी कामे करावयाची आहेत. याचे सुलभपणे यंत्रण करण्यासाठी उपयुक्त असलेला एक प्रोग्रॅम पुढे दिला आहे.
स्टेप नं. 2 (N2) पासून हा प्रोग्रॅम चालू होतो. त्यामध्ये R10 ही कर्व्ह कापावयाची आहे (स्टेप नं. N11) त्यानंतर बाह्य व्यासाचे प्रोफाइल फाइन टर्निंग केले आहे. त्यानंतर भोकाच्या व्यासाचे ओपन ड्रिलिंग केले आहे. हे सर्व झाल्यानंतर ओपन बोरिंग स्टेप नं. N45 पासून केले आहे. हे सर्व करीत असताना पुढील क्रमाने यंत्रण करण्यासाठी प्रोग्रॅम करावा लागतो, ज्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतील.
1. ओपन बाह्य व्यासाचे प्रोफाइल रफ टर्निंग
2. बाह्य व्यासाचे प्रोफाइल फाइन टर्निंग
3. ओपन ड्रिलिंग व्यास
4. ओपन बोरिंग
म्हणजे सगळ्यात शेवटी बोरिंगचे काम घेतले आहे. प्रोग्रॅममध्ये G70, G71, G74 ही कॅन्ड आवर्तने वापरली आहेत.
दिलेल्या कार्यवस्तूमध्ये Ø38, Ø34, Ø24, Ø16 असे व्यास आहेत. R10 ला त्रिज्यात्मक काप (रेडियल कट) करावयाचा आहे, तर Ø12 चे ड्रिल करावयाचे आहे. त्यासाठीचा प्रोग्रॅम पुढीलप्रमाणे होईल.
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
sheetalcomp@yahoo.com
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.