अँग्युलर मिलिंग हेड

22 May 2020 16:22:00
 
 
बंगळुरू येथील आमची फेनविक अँड रवि (FAR) कंपनी 1990 पासून मशिन टूल उद्योगक्षेत्रात नवनवीन उत्पादने विकसित करीत आहे. ग्राहकांसाठी नेहमीच वेगळे पर्याय उपलब्ध करून देणार्‍या या कंपनीची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. 2004 पासून आम्ही आमची उत्पादने इटली, फ्रान्स, यु.एस.ए., कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन, तैवान, थायलंड, तुर्कस्थान आदी देशांमध्ये निर्यात करीत आहोत. इम्टेक्स 2019 मध्ये आमच्या ‘अँग्युलर मिलिंग हेड’ या नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी ‘फाय फाउंडेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.


2_2  H x W: 0 x 
 
अँग्युलर मिलिंग हेड
अँग्युलर मिल हेड एन.सी. आणि सी.एन.सी. मशिन, खासकरून मशिनिंग सेंटरमध्ये नेमकेपणाने केल्या जाणार्‍या यंत्रणासाठी वापरले जाणारे एक अचूक साधन आहे. विशेष प्रकारचे जिग आणि फिक्श्चर यांच्या समायोजनाशिवाय (अ‍डजेस्टमेंट) आडवी (हॉरिझॉन्टल) किंवा उभी (व्हर्टिकल) मशिन, यंत्रणातील क्लिष्ट कामे करण्यासाठी सक्षम नसतात. अशा कामासाठी अँग्युलर मिल हेडचे डिझाइन केलेले असते.

2_1  H x W: 0 x 
 
अँग्युलर मिलिंग हेड, यंत्रण प्रक्रियेमध्ये अधिक कल्पक पर्याय उपलब्ध करून देते, त्याची उत्पादनक्षमता वाढविते, मशिनचा अनुत्पादक वेळ, तसेच फिक्श्चरची समायोजने कमी करते. या सगळ्यांचा यंत्रणाची अचूकता वाढविण्यावरही सकारात्मक परिणाम होतो. कारण एकदा मशिनवर लोड केलेली कार्यवस्तू यंत्रण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फारशी हलविली जात नाही. अँग्युलर मिलिंग हेड मानवी आणि स्वयंचलित टूल बदल असणार्‍या पारंपरिक मशिनिंग सेंटरला सहजपणे जोडता येतात. उत्तम अचूकतेची स्पिंडल बेअरिंग आणि ग्राइंडिंग केलेले स्पायरल बेव्हेल गिअर असलेले स्टँडर्ड अँग्युलर मिलिंग हेड, उत्कृष्ट दर्जाची यंत्रण अचूकता देऊ शकते.
 
विकसनादरम्यान आलेली आव्हाने
आम्ही ज्यावेळी अँग्युलर मिलिंग हेड डिझाइन करण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यांच्या आकाराशी संबंधित मोठी समस्या होती. उदाहरणार्थ, हे टूल मशिनच्या टूल चेंजर बॉक्समध्ये मावेल की नाही, मशिनच्या टूल चेंजर बॉक्सला जास्तीतजास्त किती वजन पेलवेल, अँग्युलर मिलिंग हेड वजन पेलण्याच्या क्षमतेमध्ये बसविता येईल का? ट्रायल अँड एरर सुधारणा पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आणि डिझाइनमध्ये काही बदल केल्यानंतर आम्ही या समस्येचे निराकरण करू शकलो.

4_2  H x W: 0 x 
 
उच्च दर्जाचा वेग मिळविणे आणि त्याची कामगिरी ही त्यानंतरची समस्या आमच्यासमोर होती. त्यासाठी उच्च गुणवत्तेचे गिअर वापरणे आवश्यक असल्यामुळे आम्ही गिअरचा शोध घेऊ लागलो. अनेक गिअर खरेदी करून त्यांच्या अनेक चाचण्याही घेतल्या. परंतु आम्हाला समाधानकारक परिणाम मिळाले नाहीत. त्यानंतर आम्ही जपानहून गिअर आयात केले आणि त्या गिअरने आमचा प्रश्न सुटला. आम्ही चाचण्या घेत राहिलो आणि चुका दुरुस्त करत गेलो. नंतर आम्ही आमचे उत्पाद सी.एम.टी.आय.प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले. आम्हाला ज्यावेळी विविध तांत्रिक चाचणी केंद्रांमधून समाधानकारक परिणाम मिळाले, तेव्हाच आम्ही हे अँग्युलर मिलिंग हेड बाजारपेठेत विक्रीसाठी आणले.
 
4_1  H x W: 0 x
 
वैशिष्ट्ये
• प्रिसिजन बेअरिंग आणि उत्तम दर्जाचे बेव्हेल गिअर असल्यामुळे कॅन्टिलीव्हर यंत्रणाच्या कामात उत्कृष्ट मजबुती आणि अचूकता मिळते.
• प्री लोडेड अँग्युलर कॉन्टॅक्ट बॉल बेअरिंगच्या जोडीने स्पिंडलला आधार दिलेला आहे.
• उत्तम दर्जाचे उष्णता वहन आणि उच्च गतीवर बराच काळ कार्य करणे यांच्यासाठी योग्य ते डिझाइन केलेले आहे.
 
QR_1  H x W: 0
•अँग्युलर मिलिंग हेडचे कार्य पाहण्यासाठी शेजारी दिलेला QR कोड मोबाइलवर स्कॅन करा.

QR_2  H x W: 0  
 
अतिरिक्त वैशिष्ट्ये
• गतीमधील वाढ
• स्वयंचलितपणे टूल बदलण्यासाठी लॉकिंग व्यवस्थेसह पोझिशनिंग पिन
• ॲडॅप्टरपासून पोझिशनिंग पिनपर्यंत विशेष पिच
• गेज प्रतलापासून विशेष लांबी
• एकाच पोझिशनिंग पिनऐवजी मल्टीपॉइंट फ्लँज
• शीतकाची व्यवस्था
 
उपलब्ध पर्याय
ड्युअल आउटपुट अँग्युलर मिलिंग हेड
एकाचवेळी दोन विरुद्ध दिशेने यंत्रण करू शकते. तसेच विविध आकाराची टूल वापरता येतात.
• फ्लेक्झिबल गेज प्लेन लांबी
• जास्तीतजास्त टॉर्क : 150 Nm
• स्टँडर्ड कॉलेट आउटपुट
• वेग : 4000 आर.पी.एम.
• गिअर रेशो : 1:1
 
युनिव्हर्सल अँग्युलर मिलिंग हेड
• वेगवेगळ्या कोनातील यंत्रणासाठी उच्च ट्रान्समिशन टॉर्क
• स्टँडर्ड कॉलेट आउटपुट
• वेग 4000 आर.पी.एम.
• गिअर रेशो : 1:1
 
वापरकर्त्यांचा अभिप्राय
हे उत्पाद वापरल्यानंतर ग्राहक अतिशय समाधानी आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न सुटले आहेत. उत्पादनक्षमता वाढण्यात आणि एकंदर उत्पादन खर्च कमी करण्यात त्यामुळे मदत झाली आहे.
FAR चे अँग्युलर मिलिंग हेड वापरल्यानंतर टर्बाइन निर्मिती दरम्यान काही यंत्रभाग एकाच सेटिंगमध्ये यंत्रण करत आल्यामुळे आमचा सर्वात मोठा प्रश्न सुटला.
 
 

r ravi_1  H x W 
आर. रवि
संचालक, फेनविक अँड रवि
0 9880019665
rravi@far.co.in
 
आर. रवि यांत्रिकी अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. बंगळुरूमधील फेनविक अँड रवि कंपनीचे ते संचालक आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0