डीबरिंगविषयी काही महत्त्वाचे...

15 Jun 2020 13:58:00
 3_2  H x W: 0 x
 
उद्योगजगतामध्ये कोणत्याही प्रकारच्या धातूवर काम करताना, सर्व प्रक्रियांमध्ये एका महत्त्वाच्या बाबीत लक्ष घालावे लागते, ते म्हणजे यंत्रण किंवा इतर प्रक्रियांच्या शेवटी कार्यवस्तुच्या कडांवर करावे लागणारे डीबरिंग. धातुच्या विविध आकारांचे यंत्रभाग तयार करताना वेल्डिंग, यंत्रण, कास्टिंग, मोल्डिंग, ट्रिमिंग, कटिंग, शिअरिंग किंवा स्लिटिंग अशा विविध प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक असलेला आणि कडा खरबरीत करणारा भाग म्हणजे ‘बर’. ही बर वेळीच काढून टाकली नाही तर यंत्रभागांवर पुढील काम करताना ऑपरेटरला इजा होऊ शकते. किंचित वाकलेले बरचे तुकडे पुढील प्रक्रियांच्या टप्प्यांमध्ये मोकळे होऊन मशिन किंवा यंत्रभागामध्ये बिघाड निर्माण करू शकतात. असा उच्छाद घालणाऱ्या बरचा वेळीच उच्छेद करण्यासाठी निरनिराळ्या पद्धती वापरल्या जातात. या बहुतांशी मॅन्युअल म्हणजे मानवी हस्तक्षेपानेच कराव्या लागतात. परंतु सर्व ठिकाणी हे डीबरिंगचे काम सोपे असतेच असे नाही. निरनिराळ्या यंत्रभागांवर निरनिराळ्या पद्धतीने कराव्या लागणाऱ्या डीबरिंगची गरज लक्षात घेऊन ‘फोर्ब्स अँड कंपनी’ने विविध बर टूल निर्माण केली आहेत.

3_2  H x W: 0 x 
 
विविध उद्योगांमध्ये या डीबरिंग प्रक्रियेची आवश्यकता आहे. कारखान्यामध्ये कास्टिंग झाल्यानंतर मोठ्या आकाराची फेटलिंग शॉप असतात. इन्व्हेस्टमेंट कास्टिंगसारख्या प्रगत प्रक्रियेनंतरही डीबरिंग करावे लागते. हेवी इंजिनिअरिंग, वेल्डिंग, फोर्जिंग या सर्व प्रक्रियांनंतर डीबरिंग केल्याशिवाय धातूचे विविध आकार वापरता येत नाहीत. ऑटोमोटिव्ह उद्योगांमध्ये तर विविध स्तरांवर डीबरिंग करावे लागते. यासाठी विविध आकाराची आणि हाताळता येतील अशा प्रकारची ग्राइंडिंग व्हील, ग्राइंडिंग माउंट, कार्बाइड रोटरी टूल, ब्रेझिंग केलेली कार्बाइड टूल किंवा एच.एस.एस. रोटरी डीबरिंग टूल इत्यादी प्रकार वापरले जातात.

3_3  H x W: 0 x 
 
बर टूलची निवड करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे, अन्यथा मोठी आणि अवजड टूल किंवा खूपच छोटी टूल त्रासदायक आणि वेळखाऊ ठरतात. पर्यायाने यात आर्थिक नुकसानही होते. योग्य टूल न वापरल्यास डीबरिंग करताना यंत्रभागाचा अतिशय महत्त्वाचा भाग आणि त्याचा पृष्ठीय फिनिश खराब होऊ शकतो. असे यंत्रभाग टाकून द्यावे लागतात किंवा पुनर्प्रक्रियेसाठी घ्यावे लागतात.
 
बर टूल

3_1  H x W: 0 x 
 
फोर्ब्स कंपनीकडून डीबरिंग प्रक्रियेचा अभ्यास करून सर्व प्रक्रियांना उपयुक्त अशा प्रकारची डीबरिंग टूल ग्राहकांना उपलब्ध करून दिली जातात.
आमच्या ‘टोटेम’च्या बर टूलमध्ये सर्व टूलचे शँक EN24 या मिश्रधातूपासून अत्यंत अचूक प्रक्रियेने टर्निंग आणि ग्राइंडिंग करून तयार केले जातात. शँक आणि कर्तन व्यास (कटिंग डायमीटर) समकेंद्रित असतात. त्यामुळे ही टूल काम करताना वेडीवाकडी फिरत नाहीत. या टूलची झीज कमी व्हावी आणि त्याच्या वापराचे आयुष्य वाढावे यासाठी यावर टायटॅनिअम नायट्राइडचे (सिरॅमिक) लेपन केलेले असते. त्यामुळे यंत्रण करताना कमी बल लागते आणि अधिक चांगल्या प्रकारे यंत्रण होते. त्याशिवाय बरचे सूक्ष्म तुकडे लवकर निघून येण्यास मदत होते.
आमच्या बर टूलने यंत्रण करताना पाच प्रकारचे काप (कट) घेता येतात. यासाठी विशिष्ट प्रकारची कर्तन कड (कटिंग एज) तयार केलेली असते.
 
1. स्टँडर्ड कट : हा काप साधारणतः ड्रिलिंग टूलप्रमाणे हेलिक्स आकाराचा असतो. यामुळे मटेरियल वेगाने काढता येते. बहुतांश सर्व ठिकाणी या कापाचे टूल वापरात दिसते. स्टील, मिश्रधातू, कास्टिंग, स्टेनलेस स्टील, ब्राँझ आणि तांबे अशा विविध धातूंवर डीबरिंग करताना ही टूल वापरतात.

6_2  H x W: 0 x 
 
2. सुप्रीम कट : यालाच डबल कट किंवा क्रॉस कट असेही म्हटले जाते. जास्त कठीण धातूंवरील मटेरियल काढण्यासाठी याचा उपयोग होतो. या कापामुळे टूल वेडेवाकडे फिरत नाही. चॅटर कमी होतो आणि चिपचे बारीक तुकडे होतात. यामुळे टूल आणि ग्राइंडरवर चांगली पकड ठेवणे शक्य होते.

6_1  H x W: 0 x 
 
3. डीलक्स कट किंवा डायमंड कट : या कापामुळे टूलवर पिरॅमिडप्रमाणे त्रिकोणी कोन तयार होतात. त्यामुळे डीबरिंग करताना अतिशय छोट्या तुकड्यांमध्ये चिप बाहेर पडतात. स्टँडर्ड कट किंवा सुप्रीम कटमध्ये ग्राइंडर टूल ओढले जाते, तसे यात होत नाही. ऑपरेटरचे नियंत्रण अधिक चांगले राहिल्याने डीबरिंगनंतर चांगला पृष्ठीय फिनिश मिळतो. उष्णतोपचार केलेल्या कठीण धातुच्या भागांवर किंवा कठीण मिश्रधातुंच्या भागांचे डीबरिंग करताना याचा विशेष उपयोग होतो.

6_3  H x W: 0 x 
 
4. ॲल्युमा कट : हा स्टँडर्ड कटसारखाच असतो, परंतु पुढच्या टोकाशी गोल पृष्ठभाग ठेवल्याने अधिक चांगले डीबरिंग करता येते. तुलनेने कमी कठीण असलेले ॲल्युमिनिअम किंवा झिंकसारखे धातू, रबर, लाकूड अशा प्रकारच्या भागांवर अनावश्यक चिप काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो.

9_2  H x W: 0 x 
 
5. कोअर्स कट : या कापाचा आकार थोडा मोठा असतो. ॲल्युमिनिअमचे 12% पेक्षा जास्त सिलिकॉन असलेले कठीण मिश्रधातू किंवा इतर धातुंच्या भागासाठी याचा वापर करता येतो.

9_1  H x W: 0 x 
 
कोणत्या प्रकारच्या वापरासाठी कशा आकाराचे बर टूल वापरणे फायदेशीर असते, हे चित्र क्र. 1 आणि 2 वरून सहज लक्षात येईल.

9_3  H x W: 0 x 

pritam_2  H x W 
 
डीबरिंग टूलची निवड
बर टूलची निवड करताना यंत्रणवेग, टूल बसविण्याची पद्धत, पॉवर टूल आणि त्याची देखभाल या गोष्टींचा विचार करावा लागतो. तसेच जे टूल डीबरिंगचे काम करते, त्याचे मटेरियल, आकार, प्रत्यक्ष धातू कापणारी कड आणि त्याचा आकार यांचाही विचार
होणे गरजेचे असते. या सर्व टूलला कोटिंग आवश्यक आहे का याचा अभ्यास केला जातो.
1. चित्र क्र. 1 आणि 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे कामासाठी योग्य आकाराचे टूल निवडा. त्याच्या शँकचा आकार जास्तीतजास्त मोठा आहे ना हे पहा.
2. टूलचा कोणता कट निवडायचा हे ठरवा.

pritam_3  H x W 
 
3 तक्ता क्र. 1 वापरून टूलचा वेग किती ठेवायचा हे ठरवा. इलेक्ट्रिकल किंवा हवेच्या दाबावर चालणाऱ्या ग्राइंडर टूलचे बेअरिंग व्यवस्थित आहे ना, टूल बसविल्यावर ते वेडेवाकडे फिरत नाही ना हे पहा.
 
प्रत्यक्ष बर काढताना घ्यावयाची काळजी
1. टूलचा वेग योग्य राखा. यामुळे चांगले यंत्रण होते आणि टूलचे आयुष्य वाढते. प्रमाणापेक्षा कमी वेग असल्यास कंपने येतात. चिप वेड्यावाकड्या निघतात आणि टूलची अधिक प्रमाणात झीज होते.
2. मोठ्या आकाराच्या गोलाकार भागावर यंत्रण करताना किंवा कमी उष्णतावाहक धातूंवर चालविताना टूलचा वेग कमी करा.
3. टूल फिरविणाऱ्या ग्राइंडर मोटरची शक्ती तुम्हाला अपेक्षित असलेल्या कामासाठी पुरेशी आहे का? हे पहा. टूलच्या कामाच्या दाबामुळे मोटरची गती कमी होता कामा नये. टंग्स्टन कार्बाइड टूल वापरताना योग्य शक्ती आणि योग्य गती आवश्यक असते.
4. टूल बसणारे कॉलेट मधून मधून तपासा. बर अडकल्याने ते खराब झाले नाही ना, त्याचे तुकडे पडले नाहीत ना, याकडे लक्ष द्या.
5. रबर, पॉलियुरेथिन इत्यादी पदार्थांवर यंत्रण करताना त्याचे तुकडे टूलला चिकटले जातात. ते काढण्यासाठी ग्रीस, केरोसिन किंवा खडूच्या पावडरसारखे मटेरियल वापरा.
6. यंत्रभागाच्या खूप आतमध्ये कार्य करण्यासाठी लांब दांड्याचे टूल वापरताना आधी टूल आतमध्ये योग्य जागेपर्यंत पोहोचू द्या आणि नंतर मोटर सुरू करा.
7. सुरक्षित वापरासाठी, यंत्रणाच्या कामासाठी वापरण्याच्या गतीच्या 1/3 गतीवर एकसारखा वेग ठेवा.
8. बर काढण्याचे कोणतेही काम करताना योग्य हातमोजे, संरक्षक चष्मे आणि पूर्ण बाह्या असलेले कपडे वापरा. यामुळे काम करताना उडणाऱ्या धातुच्या तीक्ष्ण तुकड्यांमुळे होणारे गंभीर इजा टाळता येतात.
 

 
प्रीतम आर्यनवेथील यांत्रिकी अभियंते असून, त्यांना विक्री आणि विपणन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.
सध्या ते ‘फोर्ब्स अँड कंपनी ली.’ मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर आहेत.
8879091256
preetham.arayanveetil@forbes.co.in
Powered By Sangraha 9.0