ग्राइंडिंग व्हील संग्रहण, हाताळणी आणि मशीनवर चढविणे

18 Jun 2020 14:46:00
 
आपल्या सर्वांना माहिती असेलच की, ग्राइंडिंग व्हील (चित्र क्र. 1) फारच ठिसूळ असतात आणि त्यांच्यात पटकन भेगा (क्रॅक) पडतात. वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलचे उत्पादक व्हील नेहमीच योग्य खोक्यांमध्ये अतिशय काळजीपूर्वक ठेवून पाठवितात. म्हणूनच, वापरकर्त्यांनी त्यांना खोक्यातून बाहेर काढण्यापासून त्यांच्या हाताळणीत काळजी घ्यावी. जर व्हील पाठविताना लाकडी पेट्या वापरल्या गेल्या असतील तर त्या पेट्यांचे खिळे काढण्यासाठी, ते खेचून काढण्याचे योग्य साधन वापरून त्या उघडल्या पाहिजेत. खिळे हातोडीने ठोकून बाहेर काढू नयेत. खोक्यामधून काढताना ग्राइंडिंग व्हील अबाधित राहील, हे सुनिश्चित करून व्हील हळूवारपणे बाहेर काढली पाहिजेत. प्रत्येक ग्राइंडिंग व्हील बाहेर काढल्यानंतर वाहतुकीदरम्यान भेगा किंवा अन्य नुकसानीसाठी काळजीपूर्वक तपासले पाहिजे. काही शंका असल्यास, उत्पादकांच्या प्रतिनिधींकडून त्यांची तपासणी करून घ्यावी.

3_2  H x W: 0 x 
 
ग्राइंडिंग व्हीलचे संग्रहण (स्टोरेज)
ग्राइंडिंग व्हीलचा संग्रह करण्यासाठी फक्त लाकडापासून बनलेल्या आणि लाकडी विभाजक (पार्टिशन) असलेल्या रॅकचाच वापर केला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत धातूचा कोणताही भाग ग्राइंडिंग व्हीलच्या संपर्कात येणार नाही, याची पूर्ण खात्री करून घ्यावी.
 
चित्र क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे, मोठी व्हील तळाशी ठेवली पाहिजेत, तर लहान व्हील रॅकच्या वरच्या भागात ठेवली तरी चालतील. त्यांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये लाकडी फळ्यांचे विभाजक ठेवलेले असतात. मोठे व्यास असलेल्या आणि जाड दंडगोलाकार व्हीलच्या बाबतीत, लाकडी फळी किंवा जाड कॉरुगेटेड शीट विभाजक म्हणून वापरले जातात.

3_3  H x W: 0 x 
रेझिन बाँड व्हील बनविताना रेझिन वापरले जाते, ज्याची पकडण्याची शक्ती मोल्डिंग करण्याच्या तारखेपासून काही काळानंतर कमी होते. या व्हीलवर 'उत्पादनाची तारीख' आणि' कोणत्या तारखेपूर्वी वापरण्यास योग्य' ही माहिती स्पष्टपणे नोंदविलेली असते. म्हणून या व्हीलचा संग्रह करताना आणि ती कामासाठी घेताना 'फर्स्ट इन फर्स्ट आउट (FIFO)' पद्धत काटेकोरपणे पाळली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कालबाह्य तारखेची व्हील वापरू नयेत.
जास्त उष्णता किंवा थंड वातावरणाच्या जवळपास, पाणी, तेल, आर्द्रतेच्या संपर्कात किंवा ज्यात सुटी टूल ठेवली असतील अशा ड्रॉवरमध्ये व्हील कधीही ठेवू नयेत. व्हील नेहमी कोरड्या क्षेत्रात ठेवावीत.
 
ग्राइंडिंग व्हीलची हाताळणी
ग्राइंडिंग व्हील ग्राइंडिंग मशीनवर नेताना लाकडी फळीवर ठेवून अत्यंत काळजीपूर्वक नेली पाहिजेत आणि कोणत्याही धातूच्या पृष्ठभागाशी संपर्क टाळला पाहिजे. ग्राइंडिंग व्हीलची (व्हिट्रिफाइड) ताकद काच किंवा पोर्सेलिनपेक्षा कमी असते. कोणत्याही परिस्थितीत व्हील जमिनीवर गडगडत नेली जात नाहीत. जर ते अटळ असेल, तर त्यांना रबराच्या किंवा कॉरुगेटेड शीटवरून गडगडत नेले जाऊ शकते. मशीनवर चढविण्यापूर्वी, प्रत्येक ग्राइंडिंग व्हील भेगा/नुकसान यांच्यासाठी आणि रेझिन बाँड व्हीलच्या बाबतीत कालबाह्य होण्याच्या तारखेसाठी, बारकाईने तपासणे आवश्यक आहे.
 
व्हील मशीनवर चढविणे
प्रत्येक ग्राइंडिंग व्हीलवर अधिकतम ऑपरेटिंग गतीचे (एम.ओ.एस.) मूल्य म्हणजे ते अधिकतम किती आर.पी. एम.वर फिरविले जाऊ शकते, ते चिन्हांकित केलेले असते. म्हणून व्हीलवर चिन्हांकित केलेले एम.ओ.एस. मूल्य मशीनच्या गतीपेक्षा कमी आहे, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
ग्राइंडिंग व्हील स्पिंडलवर सहजपणे चढले पाहिजे आणि कधीही स्पिंडलवर बळजबरीने बसवायला लागले नाही पाहिजे. ग्राइंडिंग व्हील चढविताना सुरक्षा उपकरणांचा वापर करा.

C1_1  H x W: 0
स्पिंडल आणि ग्राइंडिंग व्हील बोअरचे सामान्य टॉलरन्स तक्ताक्र. 1 मध्ये सूचित केले आहेत. 
चित्र क्र. 3 आणि 4 मध्ये व्हील मशीनवर चढविण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती स्पष्टपणे दाखविलेल्या आहेत. फ्लँज एकसारख्या व्यासांच्या असणे आणि फ्लँजचे टेकणारे फेस सपाट, स्वच्छ आणि कोणत्याही बर किंवा पोचा, खड्डा यांच्या विरहित असणे आवश्यक आहे. जर टेकणाऱ्या फेसवर काही प्रोजेक्शन असेल, तर त्याचा परिणाम खूपच अनर्थकारक होईल.

3_1  H x W: 0 x 

5_2  H x W: 0 x 
कारण एका तीक्ष्ण बिंदूमुळे भेग तयार होऊ शकते आणि त्यामुळे ग्राइंडिंग व्हील तुटू शकते. ग्राइंडिंग व्हील चढविताना पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. 
• स्पिंडल आणि नट फ्लँजवर पुरेसे घट्ट करा जेणेकरून ग्राइंडिंग व्हील मजबूतपणे पकडले जाईल. 
• कधीही जास्त दाब देऊ नका, कारण त्यामुळे व्हील तुटू शकते. 
• जेव्हा जेव्हा मशीनवर ग्राइंडिंग व्हील चढविले जाते, तेव्हा ग्राइंडिंग ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी, कमीतकमी एक मिनिट ते नुसतेच फिरू द्या.
ब्लॉटरचा योग्य वापर 
• कृपया लक्षात ठेवा की, ग्राइंडिंग व्हील निर्मात्याची जाहिरात करण्यासाठी ब्लॉटर (चित्र क्र. 5) नसतात. फ्लँज बेअरिंग पृष्ठभाग आणि ग्राइंडिंग व्हीलच्या बाजू या दोन परस्परांना चिकटलेल्या पृष्ठभागांच्या दरम्यान मृदू पृष्ठभाग उपलब्ध करून व्हील चढविताना निर्माण होणाऱ्या दाबाचे सम प्रमाणात वितरण करून, ते व्हीलला संरक्षण देण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य करतात. 
• ब्लॉटर हे संकुचन पावू शकणारे वॉशर असतात. फ्लँज आणि ग्राइंडिंग व्हील यांच्या पृष्ठभागांमध्ये त्यांचा उपयोग केल्याने फ्लँजचा दाब सम प्रमाणात वितरित होतो. त्यांची जाडी 0.2 आणि 1.0 मिमी. यांच्या मधली असावी आणि त्यांचा व्यास कमीतकमी फ्लँजच्या व्यासाइतका असावा.
 
नेहमी हे सुनिश्चित करा... 
1. ब्लॉटर योग्य आकार आणि मटेरियलचे आहेत. 
2. ग्राइंडिंग व्हील नव्याने किंवा पुन्हा बसविल्यावर प्रत्येकवेळी स्वच्छ आणि नवीन ब्लॉटर वापरा. जुन्या ब्लॉटरचा पुन्हा वापर करण्यास परवानगी नाही. 
3. ब्लॉटरचा पृष्ठभाग घासला गेलेला, दुमडलेला किंवा फाटलेला नाही. 
4. ब्लॉटर योग्यस्थानी आहेत आणि व्हीलच्या भोकात अडकलेले नाहीत. असे असले तर ग्राइंडिंग व्हील बदलताना प्रत्येकवेळी वेजिंग आणि असमान दाब निर्माण होतो. 
5. प्रत्येकवेळी व्हील बदलताना ब्लॉटरमध्ये काही समस्या असल्याच्या खुणांची तपासणी करा. ब्लॉटरची तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण फ्लँजमध्ये बर, तीक्ष्ण बिंदू आहेत का आणि क्लॅम्पिंगचा दाब समान रीतीने वितरित केला गेला आहे का, हे ब्लॉटरवर असलेल्या खुणांवरून लक्षात येते. 
6. फ्लँज काढत असताना ग्राइंडिंग व्हील तुटलेले आढळल्यास, एखाद्या तज्ज्ञाकडून त्या अपयशाचे कारण शोधण्यासाठी फ्लँज आणि ब्लॉटरची तपासणी करून घ्या. 
20 मिमी.पेक्षा कमी व्यासाची छोटी व्हील, माउंट केलेले पॉइंट, सेगमेंट (जिथे कॉर्कपॅडची शिफारस केली जाते), सिमेंट केलेली आणि ज्यात नट इन्सर्ट केलेला असतो अशी व्हील आणि दंडगोलाकार व्हील, यांच्यासाठी ब्लॉटर आवश्यक नाहीत. 
ग्राइंडिंग व्हील योग्यपणे माउंट केल्यानंतर, ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी व्हीलचे योग्य संतुलन सुनिश्चित केले पाहिजे.

5_1  H x W: 0 x 
 
या लेखात सांगितल्याप्रमाणे तूटफूट आणि असुरक्षित कार्यपद्धतीमुळे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संग्रहण आणि हाताळणीमध्ये व्हीलची काळजी घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 
 
 

Anil_1  H x W:  
अनिल गायकवाड 
सल्लागार 
9359104060
anilgaikwad1951@yahoo.com
अनिल गायकवाड यांत्रिकी अभियंते असून, 1973-2002 पर्यंत ते कमिन्स इंडिया लि.मध्ये टूलिंग विभागाचे प्रमुख होते. विविध कंपन्यांमध्ये ते तांत्रिक प्रशिक्षण आणि सुधारणांचे कार्य करतात.
 
Powered By Sangraha 9.0