शँफर करण्यासाठीचे विशेष टूल

12 Jul 2021 16:09:22
कारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


lkjhgfds_1  H x

 
 
कारखान्यात दोन प्रकारच्या निर्मिती प्रक्रिया चालतात. व्यवस्थित लावल्या गेलेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या मशीनवर, आज ज्याला आपण मास प्रॉडक्शन म्हणतो तसे काम होते. पण बऱ्याच ठिकाणी जसे टूल रूममध्ये किंवा काही नवीन प्रकारच्या उत्पादनांची प्रारूपे बनविताना, कमी संख्येत भाग (पार्ट) बनविले जातात. कमी संख्येत भाग बनवितानाही त्या भागांचा दर्जा अर्थातच ड्रॉइंगवर दिल्याप्रमाणेच असावा लागतो आणि तशा प्रकारच्या भागांची निर्मिती करताना खर्चिक मशीन किंवा टूलचा वापर करता येत नाही.
ghfghj_1 H x W 
 
चित्र क्र. 1 : कार्यवस्तू
 
 
आम्ही जेव्हा टर्बो चार्जरची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत होतो तेव्हा त्यातील एक बेअरिंग हे छोट्या बुशसारखे होते. लेथ मशीनवर त्याची सहज निर्मिती करता यायची. पण चित्र क्र. 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे त्याच्या परीघावर 6 भोके होती. हे कामही साध्या ड्रिल मशीनवर करता येत होते. पण या 6 भोकांचे आतील बाजूचे शँफर करणे त्रासदायक होत होते. मशीनवर हे काम करण्यासाठी लागणारी यंत्रणा तशी खर्चिक असल्याने हे काम एका डीबरिंग टूलच्या साहाय्याने हाताने केले जात होते. मात्र, भोकांच्या आतील बाजूला डीबरिंग टूलने काम करताना बेअरिंगच्या आतील भागावर चरे येण्याची समस्या येत होती. तसेच टूल भोकाच्या कडेवर नीट फिरविता येत नसल्याने तेथील बर व्यवस्थित निघत नव्हती. यानंतर आम्ही त्यातल्यात्यात बऱ्यापैकी काम झालेली बेअरिंग वापरण्याचा प्रयत्न करीत होतो.

 
नव्या टूलचे विकसन


dfghj_1  H x W:
चित्र क्र. 2 : विकसित केलेले टूल

 
 
या कामात येणाऱ्या या सर्व समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आम्ही एक एक्सेन्ट्रिक टूल तयार करण्याचा निर्णय घेतला. या टूलचा वरील भाग चित्र क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे भोकामध्ये गाइड होईल असा होता, तर पुढील बाजू लहान करून एक्सेन्ट्रिक केलेली होती. पुन्हा पुढील शॅँफर करणारा भाग गाइड करणाऱ्या भागाशी कॉन्सेन्ट्रिक होता. भोके समोरासमोर असल्याने एका भोकातून हे टूल घालून विरूद्ध बाजूच्या भोकाच्या समोर येणाऱ्या आतील बाजूस सहज शॅँफर करता येणे सोयीस्कर झाले. तसेच टूल भोकात सहज जावून पुढे आपोआप वरील भोकात गाइड मिळून खालच्या भोकापर्यंत पोहोचत होते. अगदी कमी जोर लावून हे टूल नुसते फिरविले की, उत्तम शॅँफर निर्माण होण्यास सुरू झाले. कारखान्यातील टूल क्रिबमध्येच हे टूल विकसित केले गेले. त्यामुळे भोकांचे आतील बाजूचे शँफर करण्याचे काम सहज होण्याबरोबरच तयार झालेल्या बेअरिंगच्या शॅँफरचा दर्जा उत्तम मिळू लागला.
 
 
 
श्याम वैद्य यांनी कमिन्स इंडिया लि. मध्ये सुमारे 32 वर्षे काम केले आहे.
त्यांना कॅपिटल इक्विपमेंटच्या नियोजन आणि खरेदीसाठीच्या उत्पादन अभियांत्रिकीमधील 20 वर्षांचा अनुभव आहे.
ते सध्या मशीन टूल्स आणि उत्पादन क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतात.
9860871070
v2shri@yahoo.com
   
Powered By Sangraha 9.0