एकदा आमच्या कंपनीत क्रँकशाफ्ट फ्लँजचे यंत्रण आणि शँकवर बाजूची भोके करणाऱ्या मशीनमधून ड्रिलिंग करताना मोठा 'स्क्रीचिंग' आवाज येत असल्याची तक्रार आली. या प्रक्रियेदरम्यान फ्लँजच्या बाजूला 44 मिमी. व्यासाचे स्टेप ड्रिल वापरले जात होते आणि शँकच्या बाजूला 19 मिमी. व्यासाचे ड्रिल वापरले जात होते.
सेंटर ड्रिलिंग केलेला क्रँकशाफ्ट
त्याप्रमाणे गाइड बुश काढून टाकले आणि लेथ सारखी प्रक्रिया सुरू केली. आवाज पूर्णपणे थांबला! काम करणारी व्यक्ती खुश झाली. त्याला आता इअर प्लग घालायची गरज उरली नाही. ड्रिलचे आयुर्मान वाढले हा अप्रत्यक्ष फायदा झाला तो वेगळाच. कारण ड्रिलची मार्जिन खराब होणे थांबले. गाइड बुश काढल्यामुळे कमी लांबीचे (स्वस्त) ड्रिल वापरता येऊ लागले कारण बुशमध्ये जवळजवळ 50 मिमी. वाया जात होते. यामुळे खर्चातही बचत झाली.
गाइड बुश नसलेले ड्रिल
निष्कर्ष : यंत्रण प्रक्रिया ठरविताना सेंटर ड्रिल केलेले आहे. त्यातून मुख्य ड्रिल जाऊ शकते या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले होते. प्रक्रिया ठरविताना ही चूक झाल्याने नेहमीप्रमाणे गाइड बुशची सोय केलेली होती, हे टाळता आले असते. कार्यप्रणाली ठरविताना प्रक्रिया आणि कार्यवस्तूच्या गरजांचा विचार बारकाईने करणे जरुरी असते.
9225631129